नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांमधील गटबाजीबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्यासह इतरांना आता तरी हे थांबवा, असे आवाहन केले होते. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला असून बनकर, पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण येथे तालुका राष्ट्रवादीचा मेळावा झाला. मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वावर उपस्थितांनी शिक्कामोर्तब करून तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचे आवाहन मनोगतातून केले.

विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्य़ात सुरू असलेली राष्ट्रवादीची घसरण अद्यापही थांबलेली नाही. त्यातच गटबाजीच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला अंतर्गत फटका बसत असल्याची दखल घेत अजित पवार, सुनील तटकरे यांनी अलीकडेच नाशिक येथे आयोजित मेळाव्यात जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे खडसावले होते. एकत्रितपणे परिस्थितीला सामोरे न गेल्यास पक्षाचे काही खरे नाही, याची जाणीव कडक शब्दांत करून देण्यात आली होती. त्याचा इप्सित परिणाम दिसून आला. मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, मविप्र संचालक रवींद्र देवरे, ज्येष्ठ नेते नारायण हिरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Jayant patil sharad pawar
“अजित पवारांबाबतची ती बातमी वाचून माझं मन चलबिचल झालं”, शेकापच्या जयंत पाटलांची शरद पवारांसमोर ‘मन की बात’
29 Naxalites killed on Chhattisgarh-Maharashtra border
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर तब्बल २९ नक्षलवाद्यांचा खात्मा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त

जिल्हाध्यक्ष पगार यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वाधिक आंदोलन राष्ट्रवादीने केले असून कळवण तालुक्यातील सर्व सत्ता केंद्रे राष्ट्रवादीकडे असल्याने सर्वानी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. या वेळी राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग तालुकाध्यक्षपदी कैलास बच्छाव, जिल्हा उपाध्यक्षपदी उमेश सोनवणे, किसान विभाग तालुकाध्यक्षपदी पोपट पाटील, प्रशांत पगार यांचा बनकर व पगार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, तर सूत्रसंचालन विलास रौंदळ यांनी केले. मेळाव्यास जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष विनोद खैरनार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

नितीन पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

कळवण येथील तालुका मेळाव्यात माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी एकत्र येत मार्गदर्शन केले. माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या रूपाने राजकीय छत्र हरपल्याने तालुका पोरका झाला असून शासनस्तरावरील कामे तीन वर्षांपासून ठप्प झाल्याने तालुक्याचा विकास खुंटल्याचे बनकर यांनी मांडले. ए. टी. पवार यांचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या पाठीशी आगामी निवडणुकीत भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. कळवण तालुक्यातील विकास कामे ठप्प झाल्याने आता एकसंध आणि संघटित होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून नितीन पवार यांच्या नेतृत्वावर उपस्थित नेत्यांनी शिक्कामोर्तब केले.