scorecardresearch

नातेसंबंधांचे व्यवस्थापन काळाची गरज; एचपीटी महाविद्यालयात अंकुर महोत्सव उदघाटनप्रसंगी नितीन परांजपे

नात्यांची गुंफण अर्थात ‘रिलेशनशिप मॅनेजमेंट’ आधुनिक युगात एक शास्त्र गणले जावू लागले असून नातेसंबंधांचे योग्य व्यवस्थापन नसल्यास विविध प्रकारच्या मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

नाशिक : नात्यांची गुंफण अर्थात ‘रिलेशनशिप मॅनेजमेंट’ आधुनिक युगात एक शास्त्र गणले जावू लागले असून नातेसंबंधांचे योग्य व्यवस्थापन नसल्यास विविध प्रकारच्या मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. करोनाकाळात एकाकी जीवन जगलेल्या मानवाला नातेसंबंधांचे महत्व पटले असून त्याचे योग्य व्यवस्थापनही तीतकेच महत्वाचे आहे, असे मत मानसशास्त्र अभ्यासक नितीन परांजपे यांनी व्यक्त केले.
शहरातील एच.पी.टी. महाविद्यालयातील मानसशासत्र विभागाच्यावतीने आयोजीत अंकुर महोत्सवात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रणव रत्नपारखी, डॉ. जावळे, स्टुडंट कौन्सीलचे प्रा. खलाणे, विभागप्रमुख डॉ. राजश्री कापुरे उपस्थित होते.
यंदाचा महोत्सव ‘रिलेशनशिप मॅनेजमेंट’ या विषयावर होत असून त्यासंदर्भात विविध प्रकराचे उपक्रम राबविले जात आहेत. नातेसंबंध आणि त्याचे विविध अंग परांजपे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विभागप्रमुख डॉ. कापुरे यांनी प्रास्तविक केले. विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय कौशल्यात वाढ व्हावी यासाठी २०१० पासून अंकूर महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. सूर्यवंशी यांनी नातेसंबंध व्यवस्थापनात हेतुपूर्ण क्रियाही आवश्यक असल्याचे सांगितले. दोन दिवसीय महोत्सवात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटय़, मिमिक्री, एकांकिका, सादर करीत नातेसंबंधातील पैलू उलगडले. उपक्रमांचे लेखन व दिग्दर्शन गौरी सांबरे, देशना शहा, प्रेरणा तिवारी, जास्वंदी काकड, हर्ष हिरे, मृण्मयी कुलकर्णी, नभा नरसे यांनी सादरीकरण केले. प्रा. तन्मय जोशी, प्रा. अर्चना गटकळ यांनी मार्गदर्शन केले. ऐश्वर्या जोशी यांनी परीचय करून दिला. इशा जहागिरदार यांनी आभार मानले. सृष्टी जोशी, ओजस्विता बुमरे यांनी सूत्रसंचालन केले. एच.पी.टी. महाविद्यालयात वेगवेगळय़ा कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही मदत होत असते. त्यामुळेच महाविद्यालयातून शिकलेले अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ झालेले दिसतात. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातही कार्यरत आहेत. शहराच्या विकासात महाविद्यालयाचे मोठे योगदान आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Relationship management needs time nitin paranjape inauguration ankur mahotsav hpt college amy

ताज्या बातम्या