लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यांमध्ये दोन दिवसात दोन बिबटे अडकले. यात एक नर आणि एका मादीचा समावेश आहे.

Cholera Outbreak, Belkhed Village, Cholera Outbreak in Belkhed Village, Cholera Outbreak in akola village, 180 Treated Preventive Measures, akola news,
अकोला जिल्ह्यातील बेलखेडमध्ये ‘कॉलरा’चा उद्रेक; आणखी २० रुग्ण आढळले
Akola, health, villagers,
अकोला : दूषित पाण्यामुळे ४९ ग्रामस्थांची प्रकृती बिघडली
The incident of killing of wife due to domestic dispute at Betkathi on Chhattisgarh border in Korchi taluka of the district
 पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन गावभर फिरला पती…..
25 mm first rain in Solapur The tree fell in the storm
सोलापुरात रोहिणीचा पहिलाच २५ मिमी पाऊस; वादळाने वृक्ष कोसळले; फळबागांसह घरांचेही नुकसान
Rain, Kolhapur, tree fell,
कोल्हापूरला पावसाने झोडपले; झाड मोटारीवर कोसळले
Four died after drowning in a river in Kagal taluka. Search for one
कागल तालुक्यातील नदीत बुडून चौघांचा मृत्यू; एकाचा शोध सुरु, तालुक्यावर शोककळा
Chandrapur, person died,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, बल्लारपूर तालुक्यातील घटना
Palghar, Houses damage,
पालघर : वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड

काही दिवसांपासून नायगाव, जोगलटेंभी, सोनगिरी परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्यांवर बिबट्याने हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर, बिबट्याला पकडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होऊ लागली होती.

आणखी वाचा-अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक; धुळे जिल्ह्यात नऊ महिन्यात दोन कोटीचा दंड वसूल

पश्चिम वन विभागाचे पंकज गर्ग, वनसंरक्षक अनिल पवार यांनी परिसरात जाऊन शेतकऱ्यांना सूचना केल्या होत्या. सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याचा मागोवा घेत परिसरातील गावांमध्ये सातत्याने जनजागृती करण्यात येत होती. वन विभागाकडून लावण्यात आलेल्या जाळ्यात एक दीड वर्षाचा नर तसेच दुसऱ्या दिवशी दीड वर्षाची मादी बिबट्या अडकली. या कारवाईत नायगाव ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.