धुळे – जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्यासह दोन कोटी ५४ लाख रुपयांचा मुद्देमाल रविवारी जप्त केला असून सहा जणांना अटक केली आहे. जप्त मुद्देमालात चार वाहनांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात वाहतूक आणि विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी, तंबाखू, पान मसाला वेगवेगळ्या वाहनांमधून अवैधपणे आणली जात असल्याची माहिती शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांना मिळाली होती. जिल्हा अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक पाटील यांनी पथकासह महाराष्ट्रात गुटखा घेऊन येणाऱ्या वाहनांना लक्ष्य करत सापळा रचला. एकापाठोपाठ एक अशी चार वाहने पोलिसांच्या सापळ्यात आली. रविवारी पहाटे साडेसहापासून मुंबई-आग्रा महामार्गावरील शहादा रस्त्यावर या कारवाईला सुरुवात झाली.

chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
Property worth lakhs was robbed in two house burglaries in nashik
नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब

हेही वाचा – ..तर परिस्थिती हाताबाहेर जाईल; छगन भुजबळ यांचा इशारा

इंदूरकडून धुळेकडे जाणऱ्या संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे निदर्शनास आले. शहादा फाटा (ता.शिरपूर) येथे ही कारवाई झाली. वाहन चालक नंदलाल पाटील (४२), सहचालक प्रदिप सोनवणे (२४) दोन्ही राहणार कर्ले, शिंदखेडा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात १२ लाख बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे नियोजन

वाहनासह २० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर वेगवेगळ्या तीन वाहनांसह पोलिसांनी दोन कोटी ५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सादाब हनीफ (२८), मोहम्मद हनीफ (२३) दोन्ही रा. नोरा, जि. कोसांबीन, उत्तर प्रदेश, सरवर खान (४२, ओढवा,गुजरात) आणि साहे अहमद (४०, बरीपूर, अलाहाबाद, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कामगिरी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, छाया पाटील, हेमंत खैरनार, संदीप दरवडे, गणेश कुटे, रोशन निकम यांच्यासह पथकातील ललित पाटील, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे यांनी केली.