10 July 2020

News Flash

नवी मुंबईत भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेत

गणेश नाईक यांचे खंदे समर्थक तुर्भे स्टोअर्समधील सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी आणि संगीता वास्के यांचा समावेश आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबईतील भाजपच्या चार नगरसेवकांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात गणेश नाईक यांचे खंदे समर्थक तुर्भे स्टोअर्समधील सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी आणि संगीता वास्के यांचा समावेश आहे. या चौघांनीही काही दिवसांपूर्वी राजीनामे दिले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची हजेरी लागली तेव्हाच त्यांची दिशा स्पष्ट होती. सुरेश कुलकर्णी यांनी महापालिकेत महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 1:02 am

Web Title: bjp four corporators join shiv sena in navi mumbai abn 97
Next Stories
1 सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य द्या -डॉ. हर्षवर्धन
2 चार मृतदेह दोन महिने बंद घरात
3 महाविकास आघाडी अधांतरी?
Just Now!
X