दररोज सरासरी ८ ते ९ जणांचा मृत्यू

नवी मुंबई : कडक संचारबंदीनंतर नवी मुंबईत दीड हजारपर्यंत केलेली करोना रुग्णांची संख्या घटत ५०० पर्यंत आली आहे. मात्र करोना मृत्यूंचे प्रमाण कायम असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दिवसाला सरासरी ८ ते ९ करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.

त्यातच शहरात ५० वर्षांवरील बाधितांचे मृत्यू अधिक असून शहरातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३५०च्या वर गेलेली आहे.  त्यात प्राणवायू पातळी कमी होत असल्याने तरुण वार्गालाही धोका वाढला आहे.

एप्रिल महिन्यामध्ये सरासरी दिवसाला ८ ते ९ मृत्यू होत आहेत. पालिका आयुक्त अभिजीत बांगर मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून सरासरी ८ मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांची व लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. गृहअलगीकरणात धोका वाढला आहे.

शहरात एकीकडे उपचाराधीन रुग्णांची तसेच नव्या रुग्णांची संख्या घटत असताना दिवसाला ८ ते ९ मृत्यू हे प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे. त्यामुळे शहरातील करोनाचे मृत्यू कमी करण्यासाठी दैनंदिन बैठकीत आढावा घेऊन जास्तीत जास्त मृत्यू कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.  -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका