17 January 2021

News Flash

गवती चहा, कृष्ण-कापूर तुळस, गुळवेलला गच्चीत बहर

प्रतिकारशक्ती वाढीसाठी औषधी वनस्पतींच्या लागवडीत वाढ

प्रतिकारशक्ती वाढीसाठी औषधी वनस्पतींच्या लागवडीत वाढ

पनवेल : करोनाकाळात गवती चहा, कृष्ण-कापूर तुळस, गुळवेल या औषधी वनस्पतींच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेलमधील विविध रोपवाटिकांमध्ये सध्या फुलझाडांऐवजी औषधी वनस्पतींना मागणी वाढल्याचे चालकांनी सांगितले.

खारघर वसाहतीच्या मध्यवर्ती असलेल्या उत्सव चौकाशेजारील कोकण कृषी विकास प्रतिष्ठानमधून करोनाकाळात गेल्या तीन महिन्यांत हजारो औषधी वनस्पती रोपांची मागणी नागरिकांनी केली आहे. टाळेबंदीच्या काळात सातत्याने औषधी दुकानांप्रमाणे वनस्पती रोपांची विक्री भरमसाट वाढल्याची माहिती प्रतिष्ठानचे संचालक शेखर सावंत यांनी दिली. या मागणीत अग्रेसर असलेल्या रोपांमध्ये गवती चहा, तुळस, गुळवेल, ओवा, गोकर्णवेल, अडुळसा, लेंडीपिंपळी अशा रोपांना घरच्या गच्चीत जागा मिळू लागले आहे.

घरीच तयार करण्यात आलेल्या सेंद्रिय खतांच्या साह्य़ाने ही रोपे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे त्यातील औषधी गुण टिकून आहेत. करोनाकाळात सर्वत्र आरोग्यविषयक जागृती वाढली असताना या तीन वनस्पतींचे सेवन वाढल्याची माहिती येथील रोपवाटिका केंद्रमालकांनी दिली. सध्या केंद्रमालकांनीही या वनस्पतींची निपज वाढविण्यावर भर दिला आहे.

शहरशेतीचा वसा

जूनच्या पहिल्या आठवडय़ात संपुष्टात आल्यानंतर अनेकांनी शहरशेतीला प्राधान्य दिले. पालकांनीही मुलांच्या प्रयोगशीलतेला प्रोत्साहन दिले. यात छतावरील औषधी वनस्पती रोपांच्या वाढीसाठी मुलांनी प्रयत्न सुरू केले.  यासाठी रोपवाटिका केंद्रातून औषधी वनस्पतींचे रोपे मुलांनी मागवली. अनेक रोपवाटिका केंद्रचालकांनी मुलांना समाजमाध्यमावरून  मार्गदर्शन केले. गवती चहा (लेमन ग्रास)चा चहातील उपयोग वाढला आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुळवेलचे सेवन केले जात आहे. गोडमार आणि इन्सुलीन यासह इतर औषधी वनस्पतींच्या मागणीत वाढ झाल्याचे केंद्रचालकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 1:20 am

Web Title: cultivation of medicinal plants to increase immunity system zws 70
Next Stories
1 पोलिसांकडून सरसकट बंदी
2 पनवेलमध्ये पुन्हा तोच पेच!
3 नवी मुंबईत एक लाख ६० हजार चाचण्यांचे लक्ष्य
Just Now!
X