शिवसेना-शेकाप एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण

राज्याच्या सत्तेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने उरण पंचायत समितीतील राजकीय समीकरण बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीत शेकाप आणि शिवसेना एकत्र येतात का, याकडेही उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

उरण पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी काढलेल्या सोडतीत उरणचे पद हे सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. पंचायत समितीत शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे.

उरण पंचायत समितीची निवडणूक होऊन अडीच वर्षे पूर्ण झाली असून मागील निवडणुकीत आठपैकी शेतकरी कामगार पक्ष चार तर शिवसेना व भाजप प्रत्येकी दोन अशा त्यामुळे सभापतिपदासाठी अटीतटीची लढत झाली होती. या निवडणुकीत शेकापचे नरेश घरत चिठ्ठीवर सभापती, तर उपसभापतिपदी शेकापचा उमेदवार विजयी झाला होता. त्यानंतर भाजपच्या एका सदस्याने राजीनामा दिला. त्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शेकापच्या सदस्याने विजय मिळवला. त्यामुळे आठपैकी पाच जागा या शेकापकडे आहेत. त्यामुळे सध्या उरण पंचायत समितीमध्ये शेकाप – ५, शिवसेना – २ तर भाजप – १असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे शेकापचे पंचायत समितीत बहुमत आहे. त्यानंतर ही सभापति पदाची निवडणूक होणार आहे.