मत्स्यदुष्काळ आणि पावसाळ्याच्या तोंडावर खरेदी वाढल्याचा परिणाम

उरण : पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर वाढलेली मागणी आणि मत्स्यदुष्काळामुळे घटलेला पुरवठा, यामुळे सध्या सुक्या मासळीच्या दरांत किलोमागे सुमारे १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याची बेगमी म्हणून सुक्या मासळीचा साठा करून ठेवणाऱ्यांना खरेदीत हात आखडता घ्यावा लागत आहे.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही

पावसाळ्यात मासेमारी बंदी लागू होत असल्यामुळे ताजे मासे मिळेनासे होतात, त्यांच्या किमतीही वधारतात. त्यामुळे या चार महिन्यांकरिता किनारपट्टीवरील रहिवासी सुक्या मासळीचा साठा करून ठेवतात. त्यासाठी मेअखेपर्यंत या मासळीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र मासळीचा दुष्काळ, शहरीकरणाने गिळंकृत केलेल्या मासे सुकवण्याच्या जागा यामुळे सुक्या मासळीची उपलब्धता घटली आहे. दर मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना पावसाळ्यापूर्वीच्या सुक्या मासळीच्या खरेदीला आवर घालावा लागत आहे. महागलेल्या मासळीमुळे अनेकांनी आपला हात आखडता घेतला आहे.

पावसाळ्याच्या दोन महिन्यांत मासळीच्या प्रजननसाठी खोल समुद्रातील मासेमारीवर राज्य व केंद्र सरकारकडून बंदी घातली जाते. त्यामुळे या काळात मासळी मिळत नाही. पर्याय म्हणून खवय्ये पावसाळ्यात सुक्या मासळीचा आस्वाद घेतात. जादा मासळी मीठ लावून कडक उन्हात सुकवली जाते. सुक्या मासळीचा बाजार पावसाळा जवळ आला की तेजीत येतो. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रातील मिळणाऱ्या मासळीचेच प्रमाण कमी झाल्याने सुकी मासळीही कमी झाली आहे, अशी माहिती मासळी विक्रेत्या शकू पाटील यांनी दिली.

सुकटीचे वेगवेगळे प्रकार किलोमागे सुमारे १०० रुपयांनी महागले आहेत. वाकटय़ा, शिंगाला, माकोल, बोंबीलचे दरही वाढले आहेत. या सर्व माशांचा आकारही पूर्वीच्या तुलनेत लहान झाला आहे. पूर्वीप्रमाणे मोठय़ा आकाराची मासळी आता मिळेनाशीच झाली आहे. सुकी मासळी महागल्यामुळे मागणीही घटली आहे.

– नंदिीनी कोळी, मासळी विक्रेत्या

दरवाढ (रुपय/किलो)

प्रकार         पूर्वी    सध्या

जाडी सुकट     ३५०    ४५०

लहान सुकट     २५०    ३५०

टेंगळी सुकट    ४००    ५००

कोळंबी सोडे     १२००   १५००