News Flash

नवी मुंबई : शहरात आज आढळले ३५१ नवे करोना रुग्ण

करोनाबधितांची एकूण संख्या पोहोचली २०,९०० वर

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या २०,००० पार झाली आहे. शहरात आज ३५१ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत.

वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या २०,९०० झाली आहे. शहरात आज ३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ५०६ झाली आहे. शहरात आतापर्यत एकूण तब्बल १६,६५६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ३,७३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात करोनामुक्तीचा दर ८० टक्के झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 10:11 pm

Web Title: navi mumbai 351 new corona patients were found in the city today aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘शून्य मृत्यूदरा’साठी पालिकेकडे सातत्य आवश्यक’
2 तळोजात ‘काळे पाणी’
3 गणरायाचे आठ दिवस आधीच घरी आगमन
Just Now!
X