News Flash

नवी मुंबई: अफेयरच्या संशयावरुन बॉयफ्रेंडनं केली तरुणीची हत्या, दोघेही बांगलादेशी

रीना आपल्या दोन मैत्रिणींसोबत कळंबोली येथील फ्लॅटमध्ये राहत होती...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या एका 26 वर्षीय बांगलादेशी तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. तिचा प्रियकरही बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलं असून रीनाचे परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरुन प्रियकराने तिची हत्या केल्याची माहिती आहे.

लिपी सागर शेख उर्फ रीना शेख असं मृत तरुणीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 डिसेंबर रोजी कळंबोली येथील फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह आढळला. रीना शेख हिची गळा आवळून हत्या करण्यात आली, त्यानंतर मारेकऱ्याने तिचा मृतदेह फ्लॅटमध्ये सोडून पळ काढला होता. साधारण तीन आठवड्यानंतर हत्येची घटना उघडकीस आली.

कशी उघडकीस आली घटना –
मुंबई मिररच्या वृत्तनुसार, मृत रीना आपल्या दोन मैत्रिणींसोबत कळंबोली येथील फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्या मैत्रिणीही बांगलादेशी होत्या. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याने तिच्या मैत्रिणी बांगलादेशला निघून गेल्या , पण रीना कळंबोलीमध्येच थांबली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणी नोकरीसाठी नवी मुंबईत परतल्या. फ्लॅट बंद असल्याने त्यांनी रीनाला अनेकदा फोन केला पण तिने उत्तर न दिल्याने त्यांनी मालकाला फोन करुन चावी मागितली. पण, रीना अजूनही फ्लॅटमध्येच राहत असल्याने चावी तिच्याकडेच असल्याचे मालकाने सांगितले. त्यावर तिच्या मैत्रिणींनी फ्लॅटच्या ब्रोकरकडून डुप्लिकेट चावी घेतली आणि फ्लॅट उघडला. तेव्हा कुजलेल्या अवस्थेत रीनाचा मृतदेह आढळला. त्यांनीतातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांच्या चौकशीत रीनाचे बांगलादेशी तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि मैत्रिणी गेल्यानंतर तो रीनासोबत फ्लॅटमध्येच राहत होता. पुढील तपासामध्ये पोलिसांना तिचा प्रियकर बांगलादेशला पळून गेला नसून तो भारतातच असल्याचे समजले. नंतर पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्कद्वारे रीनाच्या प्रियकराला शोधून काढले. रीनाचे बाहेर आणखी एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध असून ती मला फसवत होती. रीनाचे परपुरुषाशी संबंध होते आणि ती मला फसवत होती त्यामुळे गळा दाबून तिची हत्या केली व फ्लॅट लॉक करुन पळ काढला अशी कबुली त्याने पोलिसांच्या चौकशीत दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 11:31 am

Web Title: navi mumbai kalamboli 26 year old woman murdered by boyfriend body found 3 weeks later sas 89
Next Stories
1 पहिल्या टप्प्यातच मेट्रो ‘रुतली’!
2 मोरबे परिसरात बिबटय़ाची शिकार
3 हापूसची यंदा प्रतीक्षा
Just Now!
X