07 July 2020

News Flash

नवीन जादूगार घडविण्यासाठी लवकरच विद्यापीठ

जगविख्यात जादूगार पी. सी. सरकार लवकरच जादूचे प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू करणार आहेत.

पी. सी. सरकार यांची घोषणा

जगविख्यात जादूगार पी. सी. सरकार लवकरच जादूचे प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू करणार आहेत. सरकार यांच्या जादूचे प्रयोग सध्या वाशी येथे आयोजित करण्यात आले आहेत, त्या पाश्र्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. आपली मुलगी मनेका सध्या या क्षेत्रात असून माझा वारसा ती चालवत आहे, तिच्याप्रमाणे अन्य तरुण-तरुणींनाही या कलेचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी आपण आसाम राज्यातील नौगन या ठिकाणी जादूचे प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू करणार आहोत, असे ते म्हणाले.
जादूच्या प्रयोगांची आबालवृद्धांवर नेहमीच मोहिनी पडते. सध्याच्या पिढीत मात्र ही कला पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे सरकार यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वडिलांकडून ही कला आत्मसात करणाऱ्या सरकार यांनी आता हा वारसा आपल्या मुलीकडे सोपवला आहे. जादू विद्येवर प्रबंध सादर करून पीएच.डी. मिळविणारे ते एकमेव जादूगार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:02 am

Web Title: p c sarkar launch new magician school
Next Stories
1 उद्योजकांनी विंधणविहिरी खोदाव्यात
2 पनवेलचे महानगरपालिकेत रुपांतर करण्याच्या हालचालींना वेग
3 पोटच्या मुलींची हत्या करत महिलेची आत्महत्या
Just Now!
X