कोपरखैरणेमध्ये नागरिक त्रस्त; वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

नवी मुंबईतील कोपरखरणे परिसरात सध्या अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आह. वीज, पाण्याचा तुटवडा असून वाहतूक कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे. या परिसरात वाहनतळ नसल्याने रस्त्याचा दुतर्फा बेकायदा वाहने उभी केली जात असून यामुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

कोपरखरणे या परिसर सिडकोने माथाडी वसाहतीसाठी नियोजन करीत येथे माथाडींसाठी ओटे देण्यात आले. या ओटल्यांवर आता तीन ते चार मजले उभे राहिले आहेत. त्यामुळे पूर्वीची नियोजित लोकसंख्या चार पटींनी वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी वीज, पाण्याचा मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याने नेहमीच तुटवडा जाणवत आहे. एका एका घरामध्ये तीन-चार वाहने आली असल्याने या गाडय़ा लावायच्या कुठे? ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे वाहने लावली जातात. अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांवरही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आधीच अरुंद रस्ते अधिकच अरुंद होत आहेत. त्यामुळे दोन वाहने पास होणे कठीण होत आहे. कोपरखैरणे विभागात रेल्वे स्थानकाबाहेर एकमेव वाहनतळ आहे. त्यामुळे नागरिकांसह ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक रस्त्यावरच वाहने उभी करीत आहेत.

कोपरखैरणे सेक्टर २२ येथून हॉटेल ब्ल्यू डायमंड ते कोपरखैरणे तीन टाकीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जातात. हा मुख्य रस्ता असून घसणोली, महापे, ऐरोली, मुलंड यांना जोडणारा आहे. त्यामुळे या भागातोहनांची वर्दळ असते. तीनटाकी ते  (पान ३वर)

टोइंग बंद

कोपरखैरणे वाहतूक शाखेतील टोइंग वाहनात बिघाड झाल्याने कारवाई बंद आहे. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. ही कारवाई होत असल्याने बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागते. – उमेश मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग कोपरखैरणे

मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लावलेल्या असतात. त्यामुळे तोकडय़ा रस्त्यांवर वाहतुकीची समस्या निर्माण होते. रस्ता पार करताना वाहनचालक थांबण्याची तसदीदेखील घेत नाहीत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. – सुदेश जायगुडे, नागरिक