उरण तालुक्यातील चाणजे गावात एका गाईला जुळी वासरे झाली आहेत. ही जर्सी गाय असून अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही चाणजे येथे जाऊन याची माहिती घेतली. शेतीला जोडव्यवसाय म्हणून चाणजे येथील शेतकरी हेमंत लांगी यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी देशी गाईंसह तीन जर्सी गाईही विकत घेतल्या आहेत. यातील एका जर्सी गाईने एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. ही दोन्ही वासरे वेगवेगळ्या रंगांची आहेत. एकाच वेळी दोन वासरे होणे ही लाखात एकच घटना असल्याचे उरणचे पशु वैद्यकीय अधिकारी अनिल धांडे यांनी सांगितले. या जुळ्या वासरांना पाहण्यासाठी येथे झुंबड उडाली आहे.

Four died after drowning in a river in Kagal taluka. Search for one
कागल तालुक्यातील नदीत बुडून चौघांचा मृत्यू; एकाचा शोध सुरु, तालुक्यावर शोककळा
Jambhivali, childrens,
रायगड : जांभिवलीत दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू
Palghar, Houses damage,
पालघर : वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड
Two killed in cruiser crash in Godavari nanded
गोदावरीत क्रुझर कोसळून दोघांचा मृत्यू; लोहा व मुदखेड तालुक्यातील सीमेवरील येळी महाटी पुलावरील दुर्घटना
Drugs, Kalyan, Newali village,
कल्याण जवळील नेवाळी गावातील किराणा दुकानात सापडले साडेचार कोटींचे अमली पदार्थ
heat stroke among farmers kalyan marathi news
शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक प्रमाण, बांधकामांवरील मजूर, कष्टकऱ्यांनाही फटका
water scarcity, villages, buldhana district
बुलढाणा : १८२ गावांत पाणी पेटले! अडीच लाख ग्रामस्थांचे हाल, ५ तालुक्यातील ४६ गावांना टँकरने पाणी पुरवठा
Decrease in water storage in dams compared to last year
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट