नवी मुंबई : नवी मुंबईत बार हॉटेल्स सकाळ पर्यंत सुरु असतात अशी नेहमीच चर्चा होते. या चर्चेतील सत्य सकाळ पर्यंत सुरु असलेल्या हॉटेल चालकाच्या तक्रारी वरून समोर आले आहे. या हॉटेल मध्ये पहाटे चार वाजता काही लोकांनी प्रवेश करून मद्य दिले नाही म्हणून हाणामारी, तोडफोड बंदूक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सकाळी चार ते पहाटे सहा पर्यंत सुरु होता. या प्रकरणी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

 राहुल आंग्रे, सुरज ढोणे व अन्य त्यांचे मित्र असे आरोपींची नावे आहेत. तक्रारी नुसार वाशी सेक्टर १९ येथील पाम बीच गॅलरीया या मॉल मधील सेव्हन्थ स्काय हॉटेल चालक निकुंज कांतीलाल सावला यांनी रात्री दिड वाजता हॉटेल बंद केले. त्यानंतर हॉटेलचे पार्टनर सुनिल वालजी यांच्या वाढदिवसाची पार्टी आप्त स्वकीय आणि व्यावसायीक मित्रात सुरु झाली. सुनील यांच्या ओळखीचे आहोत म्हणून  राहुल शैलेंद्र आंग्रे, सुरज नानासाहेब ढोणे हे त्यांचे इतर मित्रांसोबत पहाटे चारच्या सुमारास  हॉटेल मध्ये प्रवेश केला. त्यांनी मद्य मागितले मात्र न दिल्याने त्यांनी हाणामारी खुर्च्या  फेकाफेकी करीत सामानाची नासधूस केली.

Night Block Scheduled, CSMT Platform Expansion Work, Night Block Scheduled csmt, csmt night block, csmt night block Impacts Mumbai Train Services , marathi news, csmt news, chhatrapati Shivaji maharaj terminus,
सीएसएमटी येथे शुक्रवार-शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक; लोकल, रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल
baobab tree, angry environmentalists,
३०० वर्ष जुन्या बाओबाब झाडाची कत्तल, संतप्त पर्यावरणप्रेमी उद्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार
Tragic Accident in Nagpur, death of Newlywed man, two wheeler accident in Nagpur, Jabalpur Nagpur outer ring road, accident in Nagpur, marathi news accident news, Nagpur news,
नववधू पतीची दारात वाट पहात होती, मात्र घरी आले…
Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?

हेही वाचा >>> विना परवानगी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे महागात पडले; पनवेलमधील आयोजकांवर गुन्हा दाखल

तसेच पिस्टल दाखवून दहशद माजवत हॉटेल चालक निकुंज यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार सकाळी सहा पर्यंत सुरु होता. या प्रकरणी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असल्याचे कळताच हॉटेल चालक निकुंज कांतीलाल सावला यांना राहुल आंग्रे याने निकुंज  शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारी मुले शहरातील हॉटेल्स बार सकाळ पर्यंत सुरु असते याला पुष्टी मिळते असे समोर आले आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच यातील मुख्य आरोपी राहुल आंग्रे याला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपीचा शोध सुरु असून तपासात दोषी जे आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिली.