नवी मुंबई : मागील काही महिन्यांपासून नेरुळ एनआरआय परिसरातील डीपीएस फ्लेमिंगो सरोवराचा नाश थांबवण्यासाठी नॅटकनेक्ट फाऊंडेशनने केंद्राकडे विचारणा केली होती. त्याला प्रतिसाद देत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने शुक्रवारी राज्याला या समस्येची तपासणी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

सिडकोने नेरुळ येथील प्रवासी जलवाहतूक टर्मिनलच्या पर्यावरणीय मंजुरीमध्ये लादलेल्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास असलेला तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि तेथील फ्लेमिंगोंचा मृत्यू होत असल्याकडे नॅटकनेक्ट फाऊंडेशनने केंद्राच्या पर्यावरण व वन विभागाला कळवले होते.

हेही वाचा : “इंडिया आघाडीला सत्ता मिळणार”, आदित्य ठाकरे यांचा उरणच्या जाहीर सभेत विश्वास

सिडको नैसर्गिक आंतरभरतीच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणणार नाही, अशी एक अट होती. परंतु तलावाकडे जाणाऱ्या जलवाहिन्या गाडल्या गेल्या असून त्यामुळे आंतरभरतीचे पाणी तलावाकडे येण्याचा मार्ग बंद झाल्याने डीपीएस तलाव कोरडा पडला असून त्यामुळे मागील काही दुर्घटनांमध्ये १० फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला तरी काही फ्लेमिंगो जखमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. फ्लेमिंगोंच्या मृत्यूला सिडको जबबदार असून त्यांच्याच दुर्लक्षामुळे तलावात येणाऱ्या भरतीच्या पाण्याचा प्रवाह बंद झाल्यानेच फ्लेमिंगोच्या दुर्घटनांचा घटनाक्रम सुरू झाला होता.

केंद्राच्या इम्पॅक्ट असेसमेंट विभागातील ईमेलने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीला या समस्येचे परीक्षण करण्यास आणि तक्रारकर्त्याला तसेच मंत्रालयाला प्रतिसाद देण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फ्लेमिंगोच्या अधिवासावरुन सिडकोच्या बोटचेप्या भूमिकेमुळे साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: घाऊक बाजारात नवीन ज्वारी दाखल; दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर

केंद्राच्या इम्पॅक्ट असेसमेंट विभागातील ईमेलने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीला या समस्येचे परीक्षण करण्यास आणि तक्रारकर्त्याला तसेच मंत्रालयाला प्रतिसाद देण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फ्लेमिंगोच्या अधिवासावरुन सिडकोच्या बोटचेप्या भूमिकेमुळे साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : खारघरमध्ये छळवणूकीतून महिलेची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य मॅन्ग्रोव्ह सेलच्या एका उच्चस्तरीय पथकाने काही दिवसापूर्वीच तलावाला भेट दिली होती. त्याबाबतचा सिडकोच्या दुर्लक्षपणाचा अहवाल दिला आहे. तसेच पशुसंवर्धन आणि पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता, आम्ही तलावातील सर्व ‘चोक पॉइंट्स’ काढून टाकण्याची आणि आंतरभरतीच्या पाण्याचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे मत नवी मुंबई एन्वाहयर्न्मेंट प्रिझर्वेशन ग्रुपचे संदीप सरीन यांनी सांगितले.