पनवेल : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे पनवेल येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. वडीलोपार्जित जमीनीवर हक्क सांगून त्यांचे भागधारकांमध्ये अनेक वादविवाद उजेडात येत आहे. पनवेल पोलीस ठाण्यात नूकत्याच नोंदविलेल्या एका फसवणूकीच्या गुन्ह्यात  १३ वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या वडिलांना मृत घोषित करुन त्या वडीलांचे खोटे वारस दाखला न्यायालयाची दिशाभूल करुन बनवून जमिन बळकाविण्याचा प्रकार उजेडात आला आहे.

हेही वाचा >>> मोठ्या आवाजात भांडणाऱ्याकडे पाहिल्याने कामोठ्यात डॉक्टराला मारहाण

ठाणे येथील नौपाडा येथे राहणाऱ्या रोहीणी मालपेकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांचे वडील नामदेव म्हात्रे हे ४ जुलै २०११ रोजी जिवंत असतानाही त्यांचे नातेवाईक राजेंद्र म्हात्रे, शरद म्हात्रे, सुभद्रा तळकर यांनी नामदेव यांना मृत असल्याचे कागदोपत्री न्यायालयास दर्शवून बनावट वारस दाखला मिळविला. तो बनावट वारसदाखला पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वापरुन त्यासंदर्भात खोटे दस्त बनविल्याची तक्रार पोलीसांत रोहीणी यांनी दिली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.