वाशी रेल्वे स्थानकासमोरील असणाऱ्या रिअल टेक पार्कमधील बेकायदा बांधकामांवर शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. यात १७ आलिशान कार्यालयांतील बेकायदा दुकानांवर कारवाई करण्यात आली.
रिअल टेक पार्कमधील आलिशान कार्यालयांत अंतर्गत बदल करून वा फ्लोवरबेडमध्ये बेकायदा बांधकाम करून जागा हडपल्याचे समोर आल्याने पालिकेने कारवाई केली.
१४ मजली या इमारतीमधील ४१ कार्यालयांत फ्लोवरबेडमध्ये बेकायदा बांधकाम करण्यात आले. या प्रकरणी तक्रार आल्यावर वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांनी नोटीस बजावली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. कारवाईत १२ कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. बांधकाम करणाऱ्यांविरोधात एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती डॉ. कैलास गायकवाड यांनी दिली.