नवी मुंबई: स्वार्थापोटी  महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी गहाण टाकला आहे. महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर यांना एक भ्र शब्दही काढता आला नाही. ही शिंदे सेना नाही तर विकृत सेना आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी नवी मुंबईत केला. शुक्रवारी संध्याकाळी नवी मुंबईतील वाशी येथे महाविकास आघाडीचा महिला मेळावा पार पडला. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. 

महाविकास आघाडीच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महिला मेळाव्याची शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात सर्वात जास्त गुन्हेगारी ठाणे आणि कल्याण मध्ये आहे. या दोन्ही भागांवर मुख्यमंत्र्यांचा प्रभाव आहे. येथे विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना हैराण केले जात आहे.

bjp virus hit ajit pawar says mla rohit pawar
संघाच्या मुखपत्रातून भाजपावर केलेली टीका रोहित पवारांना अमान्य; पोस्ट शेअर करत म्हणाले, “संपूर्ण देशात…”
Devendra Fadnavis,
देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे घेणार मुंबईत झाडाझडती; पराभूत उमेदवारांना निमंत्रण
Sanjay Raut and Praful Patel
“…म्हणून अजित पवार गटाला मंत्रिपद नाही”; दाऊदच्या प्रॉपर्टीचा उल्लेख करत संजय राऊतांचा मोठा दावा
What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक, पेशवाईतल्या आनंदीबाईप्रमाणे..”, संजय राऊत यांची टीका
Girish Mahajan On Eknath Khadse
“एकनाथ खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगावं”; गिरीश महाजनांचा खोचक सवाल, म्हणाले, “भाजपावर बोलण्याआधी…”
by election for rajya sabha seats in maharashtra on june
राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी २५ जूनला पोटनिवडणूक; साताऱ्याला खासदारकी?
Jitendra Awhad ajit pawar pune accident
पुण्यातील अपघात प्रकरणावरून आव्हाडांची अजित पवारांवर टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीचं कार्यालय खरेदीसाठी…”
Rohit pawar on Indapur tehsildar attack
“आता गाडीखाली जिवंत माणसं…”, इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ल्यानंतर रोहित पवारांची फडणवीसांवर टीका

आणखी वाचा- उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, निवडणुकीच्या आचारसंहितेत निधी अडकण्याची शक्यता

महाराष्ट्रात फार्मसी चे कॉलेज मोठ्या प्रमाणात आहेत दरवर्षी या कॉलेजमधून एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडतात. या विद्यार्थ्यांना राज्यातच रोजगार मिळावा यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मल्टी ट्रक प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणला होता. मात्र विद्यमान सरकारने हा प्रोजेक्ट नंतर अहमदाबादच्या घशात घातला. आपले वाटोळे करून गुजरातचे भले करणारे धोरण हे प्रकृती नसून विकृती आहे. ही विकृती ठेचून काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी यावेळी केले. 

 या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, शिवसेना समन्वयक शिल्पा सरपोतदार, रेखा खोपकर, नंदिनी विचारे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सलुजा सुतार, आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-कलिना संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी, मुंबई विद्यापीठाकडून खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय

नेहा पुरवला दिलेल्या धमकीचा निषेध 

भाजपचे उमेदवार पियुष गोयल हे मच्छी मार्केट मधून जात असताना त्यांनी नाकाला रुमाल लावला होता. ही बातमी नेहा पुरव यांनी दिली. बातमी देणे हा पत्रकारांचा अधिकार आहे. मात्र ही बातमी भाजपवाल्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी नेहा पुरव यांना थेट त्यांच्या घरी जाऊन धमकी दिली.असा आरोप करत या धमकीचा महाविकास आघाडी जाहीर निषेध करीत आहोत, असेही सुषमा अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

मोदींना घालवण्यासाठी पदर खोचून कामाला लागा 

सत्तेत येण्यापूर्वी मोदी यांनी गॅस सिलेंडरचे दर साडेतीनशे रुपये करू अशा आश्वासन दिले होते मात्र आता सिलेंडर बाराशे रुपयांच्या पुढे गेला आहे जीवनावश्यक सर्वच वस्तूंच्या किमती महागले आहेत. गोडेतेल दोनशे रुपये किलो झाले आहे. या महागाईचा सर्वाधिक फटका हा गृहिणींना बसत आहे. त्यामुळे मोदी सरकारला घालवण्यासाठी आता पदर खोचून कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उपस्थित महिलांना केले.

आणखी वाचा- नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा

मेळाव्यात नाराजी नाट्य 

महाविकास आघाडीचा मेळावा असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे सर्व घटक पक्षातील महिला नेते उपस्थित होते मात्र भाषण करताना काँग्रेस नेत्यांना अत्यंत कमी वेळ देण्यात आल्याने काँग्रेस कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी स्थानिक शिवसेना महिला नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते.