पनवेल: शाळेला सुट्या असल्याने मुले घराबाहेर खेळायला जात आहेत. नियोजित शहरात क्रीडांगण आणि उद्यानांचा अभाव आहेच परंतू उन्हाच्या तडाक्यामुळे इमारतीमध्ये खेळा असा आदेश पालकांकडून मुलांना केला जातो. मात्र इमारतीमध्ये खेळण्यासाठी अपुरी जागा असली की शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरीच खेळण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र शेजारीच नराधम असेल तर मुलांच्या सूरक्षेचा प्रश्न निर्माण होताे. नवी मुंबईतील उलवे वसाहतीमध्ये राहणा-या एका नराधमाने बुद्धिबळ खेळायच्या नावावर साडेसात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला आहे. 

हेही वाचा : एपीएमसी चटई क्षेत्र घोटाळा प्रकरणी २३ माजी संचालक सभापती सह सचिवा विरोधात गुन्हा दाखल

Monkey Shot, Monkey Shot with Illegal Firearm, Forest Department s Seminary Hills Center, Forest Department s Seminary Hills Center Treats Injured monkey, Seminary Hills Center Nagpur, forest department, Nagpur news,
बंदूकीची एक गोळी आणि कायमचे अपंगत्व.. काय घडले ?
panvel crime news
पनवेल: बहिणीसोबत एकटा घरात दिसल्याने त्याला ठार केले, तळोजातील घटना
summer health tips heatwave what happens eating mangoes daily health benefits risks
रोज नाश्त्यामध्ये आंबा खाणे फायद्याचे की तोट्याचे? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला वाचाच
son-in-law, kidnap, marriage,
लग्नाचा खर्च परत मिळविण्यासाठी जावयाचे अपहरण
Nagpur RTE Admission Scam, RTE Admission Scam, Key Conspirator RTE Admission Scam, Fake Documents, right to education,
आरटीई घोटाळा : शाहिद शरीफच्या साथीदाराच्या कार्यालयाची झडती, स्कॅनरसह बनावट कागदपत्र…
pune accident
पोर्श अपघातानंतर क्लब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पब्समधील सद्यस्थिती
Pune accident bribe
Pune Accident : रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यासाठी लाखो रुपयांची लाच? ससूनच्या कर्मचाऱ्याकडून रोख रक्कम जप्त
minors Both blood samples revealed no alcohol
अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या दोन्ही नमुन्यांत मद्यांश नसल्याचे उघड, रक्ताचे नमुने घेण्यास विलंब?

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता उलवे वसाहतीमधील सेक्टर १९ येथील पृथ्वी हाईट्स या इमारतीमध्ये राहणा-या एका नराधमाने शेजारधर्माला काळीमा फासणारा प्रकार केल्याची तक्रार पालकांनी  पोलीसांकडे केली आहे. साडेसात वर्षांची पिडीता बुद्धीबळ खेळण्यासाठी शेजारच्यांकडे गेल्यावर तीच्यावर अत्याचार करण्यात आला. सिक्रेट कोणालाच सांगू नये म्हणून या नराधमाने बालिकेला बजावले होते. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन यापूर्वीही पीडिता पहिली इयत्तेत असताना तीच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी ४० वर्षीय संशयीत आरोपी संदेश नरेंद्र पाटील याला एन.आर.आय. पोलीसांनी अटक केली आहे. एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश कदम यांनी या प्रकरणी तातडीने बलात्कार आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून रविवारी पहाटे साडेपाच वाजता नराधम संदेशला अटक केली.