पनवेल : मुंबई पोलीस दलात काम करणारे ५५ वर्षीय पोलीस उपनिरिक्षक सूरज चौगुले यांचा रविवारी पहाटे तीन वाजता पनवेलमधील पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. चौगुले चालवीत असलेली सूझुकी इर्टीगा मोटार दुभाजकला धडकल्याने हा अपघात झाल्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील सानपाडा येथे राहणारे ५५ वर्षीय पोलीस उपनिरिक्षक सूरज रामचंद्र चौगुले हे विक्रोळी येथील पार्कसाईट पोलीस ठाण्यात नेमणूकीस होते. उपनिरिक्षक चौगुले हे पोलीस ठाण्यात ड्युटीवर जात असताना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील ५/१०० या किलोमीटरवर हा अपघात झाल्याची माहिती पोलीसांकडून मिळाली.

हेही वाचा…कळंबोलीतील ८ हजार विजग्राहक सात तास विजेविना

अपघातानंतर जखमी अवस्थेत उपनिरिक्षक चौगुले यांना पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी चौगुले यांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली.