नवी मुंबई पालिकेकडून विभागवार पथकांची स्थापना

नवी मुंबई महापालिकेने प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक नियंत्रण पथके स्थापन केली आहेत. याआधीच विभाग स्तरावर प्लास्टिक संकलन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. आता आठही विभागांत नियंत्रण पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या व्यवसायिकांवर, व्यापाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्लास्टिक व थर्माकोल प्रतिबंधाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी विभाग पातळीवर २३ जूनपासून प्लास्टिक, थर्माकोल नियंत्रक पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये संबंधित विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी हे नियंत्रण पथकाचे मुख्य अधिकारी असून ही यंत्रणा प्रत्यक्षात कारवाई करणार आहे.

प्लास्टिक आणि थर्माकोल एकत्र करून नजीकच्या विभाग कार्यालयात पोहचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. संकलित प्लास्टिक, थर्माकोल तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेले जाईल व या टाकाऊ  प्लास्टिकवर प्रक्रिया करून प्लास्टिक ग्रॅन्युअल्स तयार करण्यात येतील. ज्याचा उपयोग डांबरी रस्ते बांधताना करण्यात येईल.

टोल फ्री क्रमांक

  • बेलापूर १८००२२२३१२
  • नेरुळ १८००२२२३१३
  • वाशी १८०२२२३१५
  • तुर्भे १८००२२२३१४
  • कोपरखैरणे १८००२२२३१६
  • घणसोली १८००२२२३१७
  • ऐरोली १८००२२३१८
  • दिघा १८००२२२३१९
  • महापालिका मुख्यालय १८००२२२३०९, १८००२२२३१०