scorecardresearch

नवी मुंबई: भाज्यांचे दर ५० % उतरले; घाऊक बाजारात उठाव नसल्याने शेतमाल शिल्लक

बाजारात गेल्या तीन दिवसांपासून दररोज ३०% ते ४०% भाजीपाला शिल्लक राहत असून खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

नवी मुंबई: भाज्यांचे दर ५० % उतरले; घाऊक बाजारात उठाव नसल्याने शेतमाल शिल्लक
वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांचे दर पन्नास टक्क्यांनी उतरले

वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात सध्या भाज्यांची आवक वाढली असून दर गगडगडले आहेत. तरीदेखील बाजारात ग्राहक नसल्याने ३०% ते ४०% शेतमाल शिल्लक राहत आहे. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: ‘त्या’ वादग्रस्त आश्रम चर्चवर अतिक्रमण कारवाई; चर्चच्या फादरवर बाल लैंगिक शोषण प्रकरणी झाली होती कारवाई

एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. नित्याने ५५०-६५० गाड्या भाजीपाला दाखल होत आहे. आवक वाढल्याने दर कमी झाले असून ग्राहक नसल्याने दरात ५०% घट झाली आहे. विशेषतः कोबी, वांगी, फ्लावर, वाटाणा, दुधी, टोमॅटो भाज्यांचे दर उतरले आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत भेंडी ,गवार ,फ्लॉवर हिरवी मिरची ,शिमला मिरची , वाटाणा, वांगी या भाज्यांच्या दरात घाऊक तसेच किरकोळ बाजारात दरवाढ झालेली होती. आतामात्र घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली असून देखील दरात घसरण झाली आहे, अशी माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली . गेल्या तीन दिवसांपासून बाजारात ग्राहक कमी असल्याने शेतमाला उठाव कमी आहे. त्यामुळे बाजारात गेल्या तीन दिवसांपासून दररोज ३०% ते ४०% भाजीपाला शिल्लक राहत असून खराब होत असल्याने फेकून द्यावा लागत आहे, असे मत भाजीपाला व्यापारी कैलास तांजणे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- पनवेलच्या खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका

प्रतिकिलो दर (घाऊक दर)

भाजी सध्याचे आधीचे

कोबी ४-५ १६-२०
फ्लावर ६-७ १८-२०
वांगी ५-६ २८-३०
कारली १४-१६ २४-२८
हिरविमिरची १४-१६ ३४-४०
दुधी १०-१२ २०-२४
भेंडी १६-२० ३०-३२
गवार ३०-३२ ४०-४४
हिरवा वाटाणा ३६-४० ५०-६०
टोमॅटो ८-१० १२-१४

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 18:40 IST

संबंधित बातम्या