scorecardresearch

VIDEO : वाशी खाडी पुलावर वाळूचा डंपर पलटी, पनवेल ते शीव मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

खडी वाळू वाजुला काढण्यासाठी वाशी अग्निशमन दलाची मदत घेतली जात असून यासाठी पाण्याचा मारा आणि जेसीबीचाही वापर करण्यात येत आहे.

VIDEO : वाशी खाडी पुलावर वाळूचा डंपर पलटी, पनवेल ते शीव मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी
अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.

नवी मुंबई: आज पहाटे पनवेल सायन (शीव) मार्गावर वाशी खाडी पुलावर खडी वाळू वाहून नेणारा डंपरचा अपघात झाला आणि पूर्ण डंपर मधील वाळू खडी रस्त्यावर पडली. त्यामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. खडी वाळू वाजुला काढण्यासाठी वाशी अग्निशमन दलाची मदत घेतली जात असून यासाठी पाण्याचा मारा आणि जेसीबीचाही वापर करण्यात येत आहे.

आज (शनिवारी) पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी हा अपघात घडला. वाळू खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्याने मुंबई कडे जाणाऱ्या तिन्ही मार्गिकेवरील वाहतूक ठप्प झाली. पहाटे पासूनच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र गोवा भागातील शेकडो प्रवासी बस तेवढीच हलक्या गाड्या आणि नियमित होणारी वाहतूक यामुळे सुमारे अर्धा तास पूर्णपणे ठप्प झाली. ही वाहतूक कोंडी वाशी पथकर नाका ते उरण फाट्या पर्यंत म्हणजे सुमारे आठ किलोमीटर पर्यंत  पोहचली होती.

VIDEO ::

हेही वाचा >>> नवी मुंबई पनवेल परिसरात महावितरणचे १२ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित

सध्या वाळू खाडी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून गाड्या धिम्या गतीने सोडल्या जात आहे. एक मार्गिका मोकळी करण्यात आली आहे. लवकरच पूर्ण रस्ता सुरू करण्यात येईल. अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुराव देशमुख यांनी दिली. वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यास किमान दोन तास तरी लागतील.सद्य परिस्थितीत सानपाडा पर्यंत वाहतूक कोंडी आहे

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 09:54 IST

संबंधित बातम्या