नवी मुंबई: गृहमंत्रालयाकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दबाव टाकला जात आहे, त्यासाठी ठिकठिकाणी खोटे गुन्हे नोंद करून नाहक त्रास दिला जात आहेत. याचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटना, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वर मोर्चा काढणार आहेत. या बाबतची माहिती वाशीतील पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारे यांनी दिली. स्वातंत्र्य पूर्वी देशभक्तांनावर खोटे गुन्हे नोंदवले जात होते तोच प्रकार आज होत आहे. वास्तविक याच शिवसैनिकांच्या जोरावर हे निवडून आले आहेत. ठाणे मीरा भाईंदर नवी मुंबई असे सर्वत्र सुरू आहे. बिहारला लाजवेल असा प्रकार सुरू आहे, असा आरोप वाशीतील पत्रकार परिषदेत सेना नेत्यांनी केला.

चँप्टर केसेस, एम.आर.पी.टी. असे खोटे गुन्हे नोंद होत आहेत. माजी नगरसेवक मनोहर मढवी यांना तडीपार केले. माजी विरोधीपक्ष नेता मनोज हळदणकर यांच्यावर गुन्हे दाखल केले. पोलिसांच्या उपस्थितीत शाखा बळकावण्याचे प्रकार होत आहेत. अडीच वर्षात चांगले काम केल्याने सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आज मनपात कुठेही लोकप्रतिनिधी नाही तरीही त्यांच्या लोकांना खैरात वाटल्या प्रमाणे पोलीस संरक्षण आहे. खाजगी स्वीय सहाय्यक यांना दोन दोन पोलीस संरक्षण दिले जात आहे. मात्र आमच्या माणसांचे काढले जाते माझेही पोलीस संरक्षण कमी केले आहे. अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.

अंधेरी पूर्व मतदार संघातील मागचा निकाल पाहता व नंतरचे काम पाहत आमचा विजय नक्की होता  रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना सुरवातीलाच माघार घेतली असती तर चांगला संदेश गेला असता. अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी दिली. ठाण्यात ७८ वयाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल दंगा केला म्हणून गुन्हा दाखल, ४० जणांवर क चँप्टर मेळाव्याला गेल्याने ७ जणांवर सार्वजनिक स्थळी दंगा केला म्हणून गुन्हा दाखल केला गेला असा आरोप केला गेला. विठ्ठल मोरे (बेलापूर शिवसेनाध्यक्ष) यांच्यासह ११ वाजता बेलापूर १ ए येथून १ च्या सुमारास मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे.