सकाळी ‘ब्रेकफास्ट’ करूनच आपण कामासाठी बाहेर पडतो. यात इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती स्वयंस्पष्ट आहे; रात्रीच्या जेवणानंतरचा सुमारे १२ तासांचा ‘फास्ट’, म्हणजे उपास सोडणे म्हणजे ‘ब्रेकफास्ट’. आपल्याकडे एकेकाळी याला ‘फराळ’ म्हणायचे. ‘फल’ आणि ‘आहार’ या संस्कृत शब्दांपासून बनलेला तो शब्द. ‘नाश्ता’ किंवा ‘न्याहारी’ हे अलीकडे वापरले जाणारे प्रतिशब्द. पण आपल्याला वाटते तसे ते अस्सल देशी नसून फारसीमधील ‘नाश्तह्’ आणि ‘नहारी’ या शब्दांपासून आलेले आहेत. हा सकाळचा आहार तसा माफकच असावा, अन्यथा सुस्ती येऊन कामात लक्ष लागणार नाही. पण हल्ली अनेकदा, विशेषत: प्रवासासाठी गेल्यावर, लोक अंमळ जास्तच न्याहारी करतात. अर्थात याचे कारण उघड आहे; न्याहारीचा खर्च हा हॉटेलच्या भाडय़ातच पकडलेला असतो!

अशावेळी ब्रेड हमखास खाल्ला जातो. ब्रेडला पाव म्हटले तरी त्यामुळे तो देशी शब्द ठरत नाही, कारण पाव हा शब्ददेखील पोर्तुगीज आहे! त्याला लावतो तेही बटरच म्हणायचे. लोणी शब्द तिथे वापरला जात नाही, कारण लोणी म्हटल्यावर ताक घुसळून काढलेले घरचे पांढरेशुभ्र लोणी डोळय़ांपुढे उभे राहते. आपण गरमागरम भाकरीवर थापतो ते. आणि या ब्रेड-बटरबरोबर बहुतेकदा खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे आमलेट.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

आमलेट किंवा ऑमलेट (Omelette) या मूळ फ्रेंच शब्दाची व्युत्पत्ती मजेदार आहे. ‘क्वीझिन बुर्जवाझि’ (Cuisine Bourgeoisie, उच्चभ्रू स्वयंपाक) नावाच्या ४०० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका फ्रेंच पुस्तकात हा शब्द आढळतो. नेपोलियन आणि ऑमलेटच्या संदर्भात एक आख्यायिका प्रचलित आहे. फ्रान्समधील बेसिएर (Bessieres) नावाच्या छोटय़ा गावातून प्रवास करत असताना एका खानावळीत त्याला ऑमलेट प्रथमच खायला मिळाले. त्याला ते इतके आवडले, की गावातील सगळी अंडी गोळा करून सगळय़ा सैनिकांना त्याचे ऑमलेट खिलवावे असा त्याने हुकूम सोडला! घटना खरी असो की दंतकथा, पण तिच्या स्मरणार्थ आजही त्या दिवशी गावातील सगळे गावकरी एक भले-मोठे ऑमलेट करून एकत्र खातात! फ्रेंच स्वयंपाक अधिक नजाकतदार मानतात. म्हणून इंग्रजी शब्द काहीही असला तरी त्याचे खाद्यरूप खूपदा फ्रेंच असते. उदाहरणार्थ, इंग्रजीतील काऊ (गाय), पिग (डुक्कर) किंवा लॅम्ब (मेंढी) या शब्दांचे रूपांतर जेवताना बीफ, पोर्क आणि मटन या फ्रेंच शब्दांत होते!

– भानू काळे

  bhanukale@gmail.com