डॉ. माधवी वैद्य

आजवर आपण अनेक म्हणी बघितल्या. त्यामुळे या सांस्कृतिक संचिताची उजळणीही झाली. तरीही म्हणींसंदर्भात काही तात्त्विक गोष्टी समजून घेऊ या. संस्कृत ‘भण’ धातूपासून अपभ्रंश होऊन ‘म्हण’ हा शब्द तयार झाला आहे. जी उक्ती लोकांच्या तोंडी सतत येते आणि म्हणून दृढ होते ती ‘म्हण’. संस्कृतमधील ‘लोकोक्ती’ म्हणजे ‘म्हण’. म्हणींचा कर्ता कोण हे सांगता येत नाही.

Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?

म्हणीची व्याख्या साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी अशी केली आहे- ‘चिमुकले, चतुरपणाचे, चटकदार असे वचन म्हणजे म्हण’. कोशकार वि. वि. भिडे म्हणतात, ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण होय.’ डॉ. दुर्गा भागवत यांनी ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ अशी म्हणीची व्याख्या केली आहे. तर, वा. म. जोशी म्हणतात, ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात.’

या म्हणी काही बोधप्रद संदेश देताना दिसतात. तो संदेश देताना कहाणीकर्त्यांनी मानवी जीवनाचे, निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण केलेले दिसते. सर्व जीवनांगांचे ज्ञानाचे कण म्हणीत सामावलेले असतात. अनेक जीवनानुभवांचे मंथन करून आपल्यासमोर ठेवलेल्या म्हणी म्हणजे भाषेची लेणी आहेत. त्या कोणत्याही भाषेला सौंदर्य आणि संपन्नता बहाल करतात. ती भाषेची आभूषणे आहेत. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडणाऱ्या म्हणी आकाराने लहान, प्रासयुक्त, गेयतेचा गुण अंगभूत असणाऱ्या ठसकेबाज असतात. म्हणी या कधी कधी व्यंगचित्रांसारख्या असतात.

‘म्हण’ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुष्कळदा मौखिक परंपरेने जात असते. नवीन पिढीकडे म्हणी जर समर्थपणे नेल्या गेल्या तर हे भाषेचे सांस्कृतिक धन त्यांना निश्चितपणे आकर्षित करू शकेल. जुन्या म्हणींबरोबरच नवीन म्हणी रचल्यादेखील जातील. उदा. करोना आणि ओमायक्रॉनच्या साथीत एका मैत्रिणीने एक नवीन म्हण सांगितली, ती अशी, ‘आपली ती सर्दी आणि दुसऱ्याचा तो करोना!’