फ्रान्समध्ये पॅरिस येथे जन्मलेले सर मायकेल जेम्स लाइटहिल हे ब्रिटिश उपयोजित गणितज्ञ होते. ते कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधनाविषयीचा प्रसिद्ध ‘लाइटहिल अहवाल’ ज्यांनी सादर केला, ते हेच. जेम्स लाइटहिल यांनी १९४३ मध्ये केंब्रिज विद्यापीठाची बीए ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी ट्रिनिटी येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत काम केले. तसेच त्यांनी वायुध्वनिशास्त्र, द्रवगतिशास्त्र  या विषयांत प्रावीण्य मिळवले होते. १९७९पर्यंत गणिताचे लुकेशियन प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते.

ब्रिटनमध्ये १९७२च्या सुमारास जेम्स लाइटहिल यांना ब्रिटिश विज्ञान संशोधन परिषदेने कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी असलेल्या संशोधनाचा नि:पक्षपाती दृष्टिकोनातून आढावा घेण्यास सांगितले. लाइटहिल यांची निवड त्यांचे गणिती आणि एकूण संशोधनातील योगदान बघून केली गेली होती. लाइटहिल अहवालात असे नमूद केले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कोणत्याही विभागामध्ये आतापर्यंत लागलेल्या शोधांनी मोठा प्रभाव निर्माण केलेला नाही. हा निराशावादी अहवाल रोबोटिक्स आणि भाषा प्रक्रिया यांसारख्या पायाभूत क्षेत्रातील मूलभूत संशोधनावर टीका करणारा होता.

pregnant woman dies at bmc hospital in bhandup
अग्रलेख : या गॅरंटीचे काय?
american author paul auster life journey
व्यक्तिवेध : पॉल ऑस्टर
icc likely to issue arrest warrant against benjamin netanyahu
अन्वयार्थ : नेतान्याहू ‘वाँटेड’?
loksatta editorial on rare russian books vanishing from libraries across europe
अग्रलेख : पुष्किनचे रहस्य
Loksatta editorial Salman Khan house attacked by two assailants on a bike
अग्रलेख: सलमानी सुल्तानी!
loksatta editorial on one year of women paraded naked in manipur incident
अग्रलेख: समर्थांची संशयास्पद संवेदना
loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
deaths due to overcrowded mumbai local trains
अग्रलेख : पायाभूताचा पाया पोकळ

हेही वाचा >>> कुतूहल : जनरेटिव्ह तंत्रज्ञानाची कमाल

त्यात म्हटल्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता लहान समस्यांचे निराकरण करू शकते पण अधिक वास्तववादी समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यात संशोधक अयशस्वी ठरले आहेत. या अवलोकनामुळे बहुतेक ब्रिटिश विद्यापीठांतील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन थांबविण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. सरकारी अनुदान असो वा खासगी गुंतवणूक, दोन्हींना कात्री लागली.

या अहवालात असे संकेत आहेत की बुद्धिबळाच्या खेळात संगणकासारखे यंत्र माणसाला हरवू शकत नाही. अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाची पीछेहाट झाली. पण १९९७ साली आयबीएमच्या डीपब्ल्यू संगणकाने जगज्जेता गॅरी कॅस्पारोव्हला बुद्धिबळाच्या खेळात हरवले. संगणकाची बुद्धी श्रेष्ठ ठरली. त्यामुळे या क्षेत्रातील संशोधनासाठी पुन्हा गुंतवणूक सुरू झाली.

कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधन आणि वास्तवातल्या समस्या यावर सखोल विचारमंथनाबाबत लाइटहिल अहवाल ओळखला जातो. या दृष्टीने त्याचे अजूनही महत्त्व आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक खऱ्याखुऱ्या समस्या सोडविण्यासाठी वापरली जाते, तेव्हा या अहवालाची आठवण राहणे साहजिक आहे. लाइटहिल यांना ‘रॉयल सोसायटी’चे ‘रॉयल मेडल’ १९६४साली आणि ‘कोपले मेडल’ १९९८ साली (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले.

– डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org