महायुद्धामध्ये बेचिराख झाल्यानंतर विभक्त होऊन ४५ वर्षांनी परत एकीकरण झालेल्या बíलन शहराने त्यानंतर विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा या क्षेत्रांत केलेल्या घोडदौडीमुळे गेल्या साठ-सत्तर वर्षांत ते एक जागतिक महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जातेय. बíलनच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासात घडलेल्या घटनांनी संपूर्ण जगावर अनेक वेळा प्रभाव पडलाय. सध्याच्या ईशान्य जर्मनीत अकराव्या किंवा बाराव्या शतकात स्प्री या नदीच्या पूर्व किनाऱ्यावर स्लाव वंशाच्या लोकांनी प्रथम वस्ती केली आणि तिला त्यांनी बíलन हे नाव दिले. काहींनी स्प्री नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वस्ती केली, तिचे नाव झाले कौल्न. त्याच दरम्यान अल्बर्ट द बिअर याने ब्रांडेनबुर्ग येथे स्थापन केलेल्या माग्र्राव्हिएट घराण्याच्या राज्यात बíलन आणि कौल्न या दोन वस्त्या अंतर्भूत झाल्या. त्या प्रदेशातली जर्मन वस्ती जशी वाढत गेली तसे १४३२ साली या दोन्ही वस्त्यांचे एकीकरण होऊन त्यांना गावाचे स्वरूप येऊन त्याचे नाव झाले बर्लिन-कौल्न. पुढे हे गाव ‘बíलन’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. हा प्रदेश तत्कालीन दोन ऐतिहासिक व्यापारी मार्गावर येत असल्याने बíलनचा भराभर विकास होत गेला. १४५१ सालापासून ब्राँडेनबर्गच्या राजांनी बíलन येथे महाल बांधून आपले वसतिस्थान आणि राजधानी केली. इ.स. १४५१ ते १७७१ या काळात बíलन ही ब्राँडेनबर्गच्या माग्र्राव्हिएटची राजधानी राहिली. बर्लिन या नावाची उत्पत्ती तिथल्या मूळ स्लाव रहिवाशांच्या भाषेतल्या ‘बíल’ या शब्दातून झाली असावी. त्यांच्या भाषेत ‘बíल’ या शब्दाचा अर्थ होतो माशांचा मोठा थवा पकडण्याचे जाळे. या प्रदेशातल्या मूळच्या स्लाव लोकांचा मच्छीमारी हाच प्रमुख व्यवसाय होता. बíलन शब्दाची दुसरी व्युत्पत्ती ‘बेर’ या शब्दावरून झाली असावी. जर्मन भाषेत बेर म्हणजे अस्वल. मध्ययुगीन काळात इथे अस्वले मोठय़ा प्रमाणात आढळत असावीत. बíलन शहराच्या ध्वजावरही सध्या अस्वलांचे चित्र आहे. अस्वल हे बर्लिन शहराचे प्रतीक समजले जाते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

चवळी

फळांची, भाज्यांची सजावट करताना कांद्याच्या बाहुल्या. फ्लॉवरच्या मेंढय़ा, काळ्या वांग्याची पेंग्विन्स, बिटाचे उंदीर असे वेगवेगळे प्राणी तयार केले जातात. या सगळ्या ‘भाजी प्राण्यांना’ चवळीचे डोळे लावले की त्यांच्यात सजीवता येते. अशा सजावटीला ‘फ्रुट काìवग’ आणि ‘व्हेजिटेबल काìवग’ म्हणतात. हे ‘काìवग’ करताना चवळीच्या एका वैशिष्टय़पूर्ण गुणधर्माचा उपयोग होतो. चवळीच्या बिजाच्या खाचेभोवती असलेला काळा ठिपका. हा ठिपका काळ्या डोळ्यांसारखा दिसतो. म्हणून चवळीला इंग्रजीत ‘ब्लॅक आइड पी’ असे म्हणतात.

चवळीचे शास्त्रीय नाव ‘व्हिग्ना अंग्युक्यूलाटा’ असून ‘फॅबियासी’ कुलातील सदस्य आहे. चवळी ही वनस्पती मध्यपूर्व देशातील व भारतातील आहे असे मानले जात असले तरी रानटी चवळीची लागवड प्रथम पश्चिम आफ्रिकेत केली गेली. त्यानंतर ती इतर खंडात पसरत गेली या वेलवर्गीय वनस्पतीची पाने संयुक्त प्रकारची असून एका पानात तीन पर्णिका असतात. फुले साधारण पांढऱ्या, जांभळ्या, पिवळसर रंगांची असतात. शेंगा लांब गोलाकार असतात. अमेरिकेसारख्या देशात गुरांसाठी खाद्य म्हणून चवळीची लागवड केली जाते. म्हणून चवळीला ‘काऊ पी’ असेसुद्धा नाव आहे.

चवळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक आहे. तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम, सेलिनियम हे क्षार असतात. ‘फॉलिक आम्ल’ हे बी जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात आहे. हेच सर्व घटक चवळीला चवदार आणि पौष्टिक बनवतात. शाकाहारी व्यक्तीच्या प्रथिनांची गरज भागवण्याचे काम चवळीतील प्रथिने करतात. चवळीचे पीक हे नत्राचे स्थिरीकरण करणारे अतिशय कमी पाण्यावर येणारे आणि नापीक जमिनीतही चांगले येणारे पीक आहे. त्यामुळे ऊस, कापूस ज्वारीसारख्या मुख्य पिकांबरोबर आंतरपीक म्हणून घेता येते. चवळीचा फायदा या पिकांना होतो. हिरवळीचे खत म्हणून चवळीचा वापर शेतकरी करतात. चवळीचे पीक बाराही महिने घेता येते. दमट हवामानात चवळीवर बुरशीसारखा रोग पडतो. अति थंड हवामान चवळीला मानवत नाही.

चवळीच्या कोवळ्या शेंगा अतिशय पौष्टिक असतात. वाळलेल्या चवळीच्या दाण्यांपासून तयार केलेल्या उसळीचा आस्वाद तर आपण नेहमीच घेतो.

अशी ही बहुउपयोगी व बहुआयामी चवळी आपल्यासाठी निसर्गाने दिलेली अमूल्य देणगीच आहे.

डॉ. मनीषा करपे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org