आपल्यापकी जवळजवळ सर्वानाच आयुष्यात एकदा तरी मुंगी चावली असेल. असुरक्षित वाटल्याक्षणी मुंगी समोरच्या प्राण्याला चावते किंवा डंख मारते. त्या वेळी ती तिच्या शरीरातलं फॉर्मिक आम्ल हे रसायन शत्रूच्या त्वचेवर सोडते. या रसायनाचा स्पर्श तिच्या शत्रूला त्रासदायक ठरतो. काही ठरावीक जातीच्या मुंग्यांच्या दंशात तर पायपिरिडीन अल्कोलोइड हे विषारी रसायन असते. अशा मुंग्यांचा दंश हा अत्यंत वेदनादायक असतो.
स्वसंरक्षणाव्यतिरिक्त जीवनाला आवश्यक असलेल्या इतर अनेक बाबींसाठी मुंग्या आपल्या शरीरातली रसायने वापरत असतात. मुंग्या आपल्या खाद्याच्या किंवा वारुळाच्या दिशेने एका रांगेत जात असताना आपण नेहमीच पाहतो. मुंग्या आपल्या शरीरातून ‘फेरोमोन’नामक रसायनाचा फवारा आपल्या वाटेवर सोडत पुढे जातात. पाठच्या मुंग्या या फेरोमोन्सच्या वासाचा मागोवा घेत रांगेत पुढे जातात. ‘फेरोमोन्सचेही’ अनेक प्रकार मुंग्यांच्या शरीरात असतात. एखादी मुंगी चिरडली गेली तर तिच्या शरीरातून अत्यंत तीव्र वासाचे फेरोमोन बाहेर पडते, जेणेकरून अगदी दूरवरच्या मुंग्यांनासुद्धा धोक्याची सूचना मिळते.
एका मलेशियन जातीच्या मुंग्यांची तर तऱ्हाच वेगळी! एखाद्या शत्रू-कीटकाकडून धोक्याची जाणीव होताच या मुंग्या स्वत:च्या पोटाजवळची एक पिशवी स्वत:च्याच सोंडेने फोडतात आणि त्यातील ‘अ‍ॅसिटोफिनोन’ हे रसायन बाहेर सोडतात. या रसायनामुळे शत्रूकीटक काही काळाकरिता जायबंदी होतो आणि इतर मुंग्यांना या शत्रूच्या आगमनाची वार्ता कळते आणि त्या त्यावर योग्य ती उपाययोजना करू शकतात. पण या साऱ्या गडबडीत स्वत:चे पोट फाडून घेणारी मुंगी मात्र मरण पावते.
मुंग्या स्वसंरक्षणाबरोबरच स्वत:च्या वसाहतींचे म्हणजे वारुळांचे संरक्षण करण्यातही तत्पर असतात. वारुळात मरणाऱ्या मुंग्याचे शरीर कुजून त्यामुळे सूक्ष्म जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही कामकरी मुंग्या स्वत:च्या शरीरातून ओलिक आम्लासारख्या काही रसायनांचा फवारा वारुळात सोडतात. एवढेच नव्हे तर मेलेल्या मुंग्यांच्या शरीरातूनही ओलिक आम्लाचा अंश असलेले रसायन सोडले जाते, ज्याने वारुळांचे जंतूपासून संरक्षण होते.

प्रबोधन पर्व: कॉ. श्रीपाद अमृत डांगे – भारतीय राजकारणातील वादळ
कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील स्थान अनन्यसाधारण म्हणावे असे आहे. त्यांची इंग्लिश आणि मराठीतील साहित्यसंपदा विपुल आहे. ‘गांधी विरुद्ध लेनिन’, ‘नरकपुरी गवसली’, ‘बारा भाषणे’, ‘आदिभारत’, ‘आदिम साम्यवादाकडून दासप्रथेकडे’ ही त्यांपकी काही. ‘गांधी विरुद्ध लेनिन’ या त्यांच्या पुस्तिकेने भारतीय राजकारणात वावटळ उभी केली. खरे तर ती त्यांच्या भविष्यातील मार्क्‍सवादी राजकारणाची एक प्रकारे सुरुवात होती. मार्क्‍स आणि लेनिन यांच्या विचारांचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला.  डांगे यांना आपल्या हयातीत एकंदर चौदा वष्रे तुरुंगात काढली.  १९२४ च्या सुमारास त्यांनी मुंबईत जाहीर भाषणे करावयास सुरुवात केली. नागू सयाजी वाडीत त्यांची भाषणे होत. ‘कामगार बंधूंनो, गिरणी तुमची आहे. आज ना उद्या तुम्हा कामगारांचे राज्य येईल,’ असे ते त्यात सांगत. त्यांच्याविषयी एन. डी. पाटील म्हणतात – ‘रशियातील कामगारवर्गाने मिळविलेल्या अभूतपूर्व विजयाच्या वार्ता िहदुस्थानात येऊ नयेत म्हणून ब्रिटिश सरकारने कडेकोट नाकेबंदी केलेली होती. या क्रांतीमुळे भांडवलशाही आणि साम्राज्यवादी यांना थंडी वाजून आली होती. ही क्रांती म्हणजे साम्राज्यशाही शक्तींच्या व युद्धपिपासूंच्या विनाशाची व शेतकरी – कामगारांच्या राज्याच्या आगमनाची नंदी आहे असे ज्यांना वाटत होते त्यांना मार्क्‍सवादत आपल्या मुक्ततेचा मार्ग दिसत होता. ’’ ग. त्र्यं. माडखोलकर लिहितात – ‘‘ आगरकरांनी महाराष्ट्रात बुद्धिनिष्ठ सुधारणावादाचे प्रवर्तन केले, टिळकांनी महाराष्ट्राला स्वराज्याचा मंत्र देऊन लोकशाहीच्या लढय़ाची आघाडी उघडली व सावरकरांनी ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ असा रोकडा सवाल करून स्वतंत्र्यासाठी शस्त्र घेऊन लढण्याची शिकवण महाराष्ट्राला दिली. आधुनिक काळातील या तीन महापुरुषांप्रमाणेच डांगे यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर टिळकांप्रमाणे अखिल भारतातीलच श्रमजीवी वर्गाला मार्क्‍सवादाची दीक्षा देऊन, शेतकरी आणि कामकरी यांच्या अखिल भारतीय संघटनेचा पाया घातला.’’

chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील

मनमोराचा पिसारा: अब क्या मिसाल..
साठीच्या दशकातलं हिंदी फिल्मी गाणी म्हणजे रसिकांना पडलेलं सूरमयी स्वप्न होतं. रफी, लता, आशा, मुकेश असे कसलेले गायक, नौशाद सचिनदा, मदन-मोहन, शंकर-जयकिशन, रोशन असे बिनीचे संगीतकार होते. मजरूह शकील, साहिर, नक्शलायलपुरी असे मस्त कवी होते. खरंच तो संगीताचा सुवर्णकाळ होता. मित्रा, या गोल्डन इरामध्ये अजून बरेच लोक आहेत. जागेअभावी त्यांची नावं घेत नाही, जरा समजून घे..
तर त्या काळातल्या गाण्यात प्रणयरंग ओथंबून वाहत होता. मोहाच्या फुलांनी मन मोहरून जावं, होशो हवास उडून जावे अशा अर्थाची गीतं रचली जात होती.
नायिकेच्या सौंदर्याचं वर्णन करणाऱ्या गाण्यांचा खजिना अफाट आहे, पण तरी एखादं गाणं मनको छू लेता है.. खरं ना?
त्यातलंच हे एक गाणं.. ऐकलं असशीलच म्हणा.. अगदी चौदहवी का चांद हो.. इतकं लोकप्रिय नाही तरी.
गाणं आवडतं, कारण त्यामध्ये नितांत साधेपणा आहे. यातल्या उपमा सांकेतिक असल्या तरी त्यांची पेशकश अगदी सोपी वाटते. गाण्याची मांडणी अधिकच सोज्वळ वाटते. कारण पडद्यावर तिच्या आवडत्या शुभ्र वस्त्रामधली मीनाकुमारी दिसते. ठसठशीत कुंकू, कपाळावर घनदाट केशकलापाची महिरप घेऊन ती उभी असते, थबकते, थांबते, चालते, नजर झुकवते, मागे वळून बघते.
‘अब क्या मिसाल दू?’ असा प्रश्न करणाऱ्या थोराड चेहऱ्याच्या प्रदीपकुमारकडे पाहून ती लाजते. लाजते म्हणजे काय? त्याकाळी लाजण्याची पद्धत होती. गाण्यात रीतीरिवाजानुसार आफताब, माहताब, शम्मा असे हमखास शब्द गुंफलेले आहेत. रफीनं गाणं अतिशय ओघवत्या आवाजात म्हटलंय. असं वाटतं की, नायिकेच्या अंगावरून नायकाची नजर घरंगळते आहे. किंचित बिलगून, तिला लपेटून तिच्याभोवती घुटमळते आहे. रफीच्या आवाजातला हा स्निग्धपणा इथे मस्त खुलतो.
मजरूहनंदेखील शब्दांच्या करामती केलेल्या आहेत. म्हणजे नायिकेचा ‘चांदसा रौशन चेहरा’ असं न म्हणता माझी नायिका शीतल चंद्रकिरणाचं मनुष्यरूप आहे, असं म्हटलंय. तिच्या डोळ्यांत बगिच्यातल्या रुपेरी सौंदर्याची चमक आहे असं म्हटलंय. गाण्यात नायिकेच्या मानेचं वर्णन सहसा येत नाही, पण हिची गर्दन गुलाबाच्या फुलानं झुकलेल्या फांदीसारखी असं म्हटलंय.
आता हिंदी गाण्यात ‘लट बिखरी’ असते आणि ‘गेंसू’ मात्र खुले असतात, तसे आहेत.
तर तिचं अवघं रूप लवलवत्या ज्योतीसारखं आहे, असं नायक म्हणतो आणि ही ‘शमा’ नुस्ती प्रकाशमान नाहीये तर तिच्या सूर्यप्रकाशाचं तेज आहे, असं कवी म्हणतो. ‘मेरे घरका चिराग’ असणारी माझी प्रियतमा माझ्या स्वप्नातल्या स्वर्गाची जितीजागती प्रतिमाच आहे, असं म्हणून मजरूह थांबतात.
गंमत म्हणजे तुला आणखी कसल्या उपमा देऊ, असं म्हणत म्हणत मजरूह बरेच दाखले देतात. आता प्रेमात पडलं की, काहीतरी अजिबोगरीब होणारच ना.. मित्रा, संध्याकाळच्या वेळी हे गाणं उदबत्तीसारखं लाव.. आणि ऐ