जीभ आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव. चवीची किंवा रुचीची जाणीव करून देणं हे या जिभेचं काम. रुचीची संवेदना करून देणाऱ्या विशिष्ट  ग्रंथी जिभेवर असतात त्यांना रुचिकलिका (टेस्ट बड) म्हणतात. आपल्या जिभेवर साधारणपणे १०,००० रुचिकलिका असतात. आकारानुसार तीन प्रकारच्या रुचिकलिका आपल्या जिभेवर असतात. जिभेच्या मागच्या बाजूला लहानशा उंचवटय़ासारख्या गोलाकार रुचिकलिका असतात. जिभेच्या शेंडय़ावर कवकासारख्या किंवा दांडय़ाच्या आकाराच्या कवकरूपी रुचिकलिका असतात. तंतूरूपी कलिका जिभेच्या पृष्ठभागावर सगळीकडे पसरलेल्या असतात. बहिर्वक्र िभगाने जर आपण जिभेचं निरीक्षण केलं तर हे लहान लहान उंचवटय़ासारखे भाग आपल्याला स्पष्ट दिसतात. तसेच प्रत्येकाच्या तोंडातील रुचिकलिकांची संख्या आणि आकार थोडाफार वेगळा असतो. रुचिकलिकांमध्ये तयार झालेली संवेदना मेंदूपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीचं काम रुचिकलिका करतात. रुचिकलिकांचे आयुष्य दहा ते पंधरा दिवसांचं असतं. कोणत्याही रुचिकलिका एका विशिष्ट चवीला प्रतिसाद देत नाहीत, पण एका चवीला जास्त प्रतिसाद देतात.   सर्वच पदार्थाची चव आपल्याला कळत नाही. जर पदार्थ पाण्यात विरघळणारा असेल आणि शिवाय त्या पदार्थाला विशिष्ट रासायनिक संरचना असेल तरच चवीचे ज्ञान होते. एखादा पदार्थ आपल्या जिभेच्या पृष्ठभागावरील लाळेत विरघळला की सर्वप्रथम त्यात असलेले रसायनातील घटक वेगळे होतात. रासायनिक घटकाच्या स्वरूपानुसार रुचिकलिका रसाकुरांच्या मदतीनं चेतापेशींपर्यंत हा संदेश पोहोचवतात. चेतापेशी हा संदेश मेंदूकडे पाठवतात. ही प्रक्रिया काही क्षणात घडते. ही एक विद्युत रासायनिक यंत्रणा आहे. शिवाय पदार्थाच्या या वेगवेगळ्या चवी ह्य़ा त्यातील रासायनिक घटकांबरोबरच पदार्थाच्या तापमानावरही अवलंबून असतात. पदार्थ फार गरम असेल तर त्याची चव नीट समजत नाही आणि पदार्थ अति थंड असेल तरी तो खाताना जीभ थंड झाल्याने रुचिकलिकांची संवेदनक्षमता कमी होते.  वैज्ञानिक दृष्टिकोनातून गोड, आंबट, खारट आणि कडू अशा चार चवी मूलभूत म्हणून मानल्या जातात. या मूलभूत चार चवींची संवेदना जिभेवर वेगवेगळ्या ठिकाणी होते. गोड चव जिभेच्या टोकाला आंबट आणि खारट तिच्या बाजूला तर पाठीमागच्या बाजूला कडू चवीची संवेदना होते.

प्रबोधन पर्व: संतांनी कामास जुंपलेले संगीत
‘‘संतांना समुदाय गोळा करावयाचा होता आणि असतो. (याबाबतीत त्यांचे राजकारण्यांशी पटते!) समुदाय गोळा करावयाचा तर कान भरतील असा ध्वनी आणि डोळे निवतील असा देखावा पाहिजे. ‘हवा’ निर्माण झाली पाहिजे- गवयांच्या शब्दांत बोलायचे तर!.. समाजातल्या सर्व वर्गाना गुंतवायचे असते याकरिता जग, जयघोष, गजर, टाळ्या, लयबद्ध पावले धरणे वगैरे सर्व क्रिया राबवल्या जातात. संगीताचे जणू श्रमविभाजन होते आणि सर्वाना, एकाच वेळी समान घटनेचे भागीदार केले जाते. समाजाचा समुदाय बनतो. अशा रीतीने संगीतसूत्रात गोवलेला समुदाय हजार मुखांच्या पण एका शरीराच्या व्यक्तीसारखा वागू शकतो! संतसंगीत जणू समजातून एक विराटपुरुष कोरून काढते!’’
डॉ. अशोक दा. रानडे ‘संगीत संगती’ (ऑक्टोबर २०१४) या पुस्तकातील एका लेखात संतांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी संगीताला कसे कामाला जुंपले याविषयी लिहितात  ‘‘संतसंगीतातल्या चाली त्याच त्याच का? वाद्ये ढोबळ परिणामांची का? चार-आठ मात्रांच्या फेऱ्यांना तालांच्या जागी बसवण्याचा अट्टहास का? ठरावीक रागांच्या छायांचा वावर का? सुंदरतेपेक्षा सोपेपणा आणि अनन्यसाधारण कलाकारापेक्षा साचेबंद समूहाला वाव का?..या व यांसारख्या अनेक प्रश्नांना उत्तर एकच- संतांना संगीत राबवायचे असते, वापरायचे असते.. विशिष्ट पंथात शिरण्याआधी संगीतकार म्हणून नावारूपाला आलेल्या व्यक्तींचे संगीतपंख पंथभाव छाटून टाकतो!.. अशा वेळी संतसंगीतात आणखी एक प्रवाह निर्माण होतो आणि तो कलासंगीताला जवळ करू लागतो. रंगपीठाविषयी त्याला आपुलकी वाटू लागते. संगीत हवे की संतसंगीत, असा अवघड प्रश्न विचारला जाऊ लागतो!
कृष्णगीतांचे हवेली संगीत झाले ते अशाच प्रश्नाला संगीताच्या बाजूने कौल मिळाल्यावर. वारकरी कीर्तनापेक्षा वारकरी भजन निराळी वाट चोखाळू पाहते, ती याच प्रकारच्या निवडीमुळे. चैतन्य संप्रदायात कीर्तनपरंपरा निर्माण झाल्या तेव्हाही असेच झाले होते. संतवाणी ते संतगाणी वा देवगाणी असा प्रवास करावा लागतोच. जर संगीताचे बोलावणे मानावयाचे तर असा हा संतसंगीताचा पेच. संतसंगीताला बगल देतात, तर कधी संगीत संतांना चकवते!’’

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?

मनमोराचा पिसारा: धन्यवाद शेवंती
प्रसिद्ध गायक चंद्रकांत काळे यांचा ‘शेवंतीचे बन’ नावाचा लोककवितांवर आधारित संगीताच्या बहारदार कार्यक्रम होत असे. त्यामध्ये लोकगीतं नव्हती तरी बोली भाषेतल्या, संपादकीय सोपस्कारातून सुटलेल्या कविता असत. महाराष्ट्रातल्या अैहरणी, कोंकणी, अशा बोलीतल्या कवितांच्या कार्यक्रमाला त्यांनी ‘शेवंती’ असं नाव देऊन, शेवंतीच्या फुलांचा गौरव केला असं वाटलं.
म्हणजे, फारसं कौतुक न झालेल्या फुलांपैकी ‘शेवंती’ हे फूल खास हिवाळ्यातलं. इंग्रजीमध्ये ‘क्रिसॅन्थमम’ अशा भक्कम नावाचं फूल विदेशात दिसतं तेव्हा तसंच भरगच्च, उठावदार आणि थोटलं असतं.
शेवंतीची अगदी साधीसुधी व्हरायटी म्हणजे मोठाल्या बटणाएवढी टपोरी पिवळीजर्द फुलं. घरच्या बागेत नेमकी कोणी शेवंती हौशीनं लावली हे बहुतेकांना आठवत नसतं. शेवंती आपली आपण बिनतक्रार वाढते. विशेषत: हिवाळ्याच्या दुपारच्या कडकडीत उन्हात उभं केलं तर निसर्गत: तिला किडा-बुरशीची बाधा होत नाही. जराशा सावलीत ओलसर जागी शेवंती लावली की, हमखास कळ्या खाणाऱ्या अळ्या आणि पांढरी बुरशी लागते.
या बटण शेवंतीनं लहानपणी खूप हितगुज केलं आहे, म्हणजे फुलं मुकी, आपणच आपल्या एकटेपणाच्या गजाली सांगायच्या!
या इवल्याशा फुलात मोजता न येतील इतक्या गच्च पाकळ्या, चिमुकल्या कळ्यांमधून त्यांचा पिवळेपणा डोकावू लागला की समजायचं नजीकच्या संध्याकाळी दाटीवाटीनं फुलं फुललेली दिसणार. या फुलांच्या वेण्या फारशा दिसायच्या नाहीत. मात्र यांच्या मोठय़ा बहिणी वेणीत दिमाखात गुंफलेल्या दिसत. मोठय़ा शेवंतीचा रंग किंचित फिका पिवळा पण बाहेरच्या पाकळ्या लांब आणि टोकशी निमुळत्या. त्यांना वासही तसा मंद पण त्यांचा त्यांचा खास.
रंगाच्या गमतीजमती शेवंती खूप दाखविते. पांढरीशुभ्र, जांभळट, गुलाबी. नािरगी, पाकळ्याही लहान-मोठय़ा, निरुंद आणि लांबट.
घराघरांतल्या देवादिकांच्या तसबिरीला घातलेल्या हारांमध्ये शेवंतीची फुलं दिसतात पद्म, रक्तवर्णी जास्वंद, सुवर्णचंपक, केतकी अशी रुबाबदार नावं नसल्यानं शेवंतीचं कौतुक ना स्तोत्रात, ना भक्ती गीतांमध्ये!!
अर्थात, त्यामुळे शेवंतीचा दिमाख कमी होत नाही हार-तुऱ्यांच्या ताटव्यात ताठ मानेनं क्रिसॅन्थममचे दांडे तोऱ्यात उभे राहतात. अगदी एकेकटी शेवंती घेऊन छोटय़ाशा फुलदाणीत ठेवली तरी लेखनाच्या मेजाला शोभा येते आणि चार-दोन दिवस तशी टिकतेही.
मग मात्र शेवंती चक्क मान टाकते. तिचं असं दु:खी रूप पाहवत नाही. पानंही सुकलेली आणि पाकळ्या म्लानपणे कोमजलेल्या. शेवंतीच्या फुलांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. तुमच्या रंगतदार अस्तित्वानं वेण्या फुलतात आणि गच्च अंबाडय़ावर या घट्ट बसल्या की स्त्रियांचे चेहरेही फुलतात.
तुम्ही अशाच फुलत राहा, साधेपणानं निव्र्याज रंगांची उधळण करत..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com