यास्मिन शेख

माझ्या एका विद्यार्थिनीने स्वत: लिहिलेली एक लघुकथा मला वाचायला दिली. कथा छान होती, पण कथेतील काही शब्द मला खटकले. ती भेटल्यावर मी तिच्या कथेबद्दल अनुकूल अभिप्राय दिला, ती खूष झाली. मी तिला म्हणाले, ‘या कथेतील काही शब्द तू चुकीचे लिहिले आहेस. ते शब्द आहेत- ‘तरु, भरुन, रुपक, करुन.’ तिला आश्चर्य वाटले. ‘काय चूक? हे शब्द मी बिनचूक लिहिले आहेत.’ मी तिला म्हणाले, ‘या शब्दांतील रु तू ऱ्हस्व लिहिला आहेस. तो ऱ्हस्व रु नसून दीर्घ रू आहे.’ यावर ती काय म्हणाली, ते पाहा. ‘र ला दीर्घ ऊकार असतो?’ मी गमतीने म्हणाले, ‘इतर सर्व व्यंजनांना दीर्घ ऊकार असतो.. ऱ्हस्व आणि दीर्घ उ र या व्यंजनाला का नाही? त्याने काही अपराध केला आहे का?’ त्यावर ‘मग तो कसा लिहायचा?’ असा प्रश्न तिने विचारला, मी तिला ऱ्हस्व रु आणि दीर्घ रू लिहून दाखविले. ती मला म्हणाली, ‘मला माहीतच नव्हतं हो!’

Viral Video Woman performs Aigiri Nandini on 17th century Jal Tarang instrument Do You Know About Jal Yantra
VIDEO: ‘जलतरंग’ वाद्यावर महिलेने सादर केले स्तोत्र; ‘या’ प्राचीन वाद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Indian Railway facts
रेल्वे इंजिनवर लिहिलेल्या ‘या’ शब्दांच्या मदतीनं ओळखा गाडी कोणती आहे? कोडमध्ये दडलेली असते खास माहिती
Lynn Red Bank
व्यक्तिवेध: लिन रेड बँक
How to draw a cat using 5 four times
Video : चार वेळा इंग्रजीत पाच लिहून काढले सुंदर मांजरीचे चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच

इतर व्यंजनांत आणि र मध्ये एक महत्त्वाचा फरक आहे – फक्त लेखनात, हे मी तिला दाखवून दिले. कू, खू, चू, टू, तू, पू, क्षू या व अशा सर्व व्यंजनांना ऱ्हस्व उकार त्या व्यंजनाखाली लागतो, तसाच दीर्घ ऊकारही व्यंजनाच्या खाली लागतो. फक्त मराठीत ‘र’ या व्यंजनाला उकार-ऊकार थोडे वेगळय़ा पद्धतीने लागतात. जसे रु-रू. म्हणजे र या व्यंजनाच्या मध्यावर उकार (रु) लागतो. तसेच रू हे दीर्घ ऊकार लागलेले रूप आहे.

आता आपण काही ऱ्हस्व उकार ‘रु’ आणि दीर्घ ऊकार ‘रू’ असे शब्द पाहू या.

र- ऱ्हस्व-रु – रुपया, रुसणे, रुची, रुमाल, वरुण, करुणरस, रुचकर.

र-दीर्घ- रू – वरून, दुरून, विरून, रूप, रूपवान, लेकरू, वासरू, अंथरूण, पांघरूण, गुरू, सामान्यरूप, बुरूज.

आणखी काही शब्द – या शब्दांचे चुकीचे उच्चार आणि चुकीचे लेखन –

अक्षता-बरोबर, अक्षदा-चूक, गौरीहर-बरोबर, गौरीहार-चूक, अधीन-बरोबर, आधीन-चूक, ऊर्मी-बरोबर, उर्मी-चूक, कोणता-बरोबर, कोणचा- चूक, जादा-बरोबर, ज्यादा-चूक, डाहळी-बरोबर, डहाळी-चूक, दक्षिणा-बरोबर, दक्षणा-चूक, दूर्वा-बरोबर, दुर्वा-चूक.