कासा : पालघर जिल्ह्यामध्ये मोठय़ा प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे  शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रभारी केंद्रप्रमुखांचे काम सांभाळणाऱ्या १२८ प्रभारी केंद्रप्रमुख शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मूळ शाळेवर पाठवण्यात आले आहे. जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या झाल्याने जिल्ह्यातील बऱ्याचशा शाळा या शून्य शिक्षकी झाल्या आहेत. तसेच काही शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत. ज्या शिक्षकांकडे प्रभारी केंद्रप्रमुख पदाचा भार होता त्यांना आपल्या मूळ शाळेत जाऊन ऑनलाइन पद्धतीने केंद्रातील माहिती गोळा करण्यास सांगितले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रभारी केंद्रप्रमुख पदावर काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या शाळेवर पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये १५० केंद्रप्रमुख पदे असून केवळ २२ नियमित केंद्रप्रमुख आहेत. त्यामुळे १२८ केंद्रांचा पदभार त्या त्या केंद्रातील वरिष्ठ पदवीधर शिक्षकांना देण्यात आला होता. शाळेवर थांबून ऑनलाइन पद्धतीने माहिती संकलित करण्याच्या सूचना आल्यानंतर डहाणू तालुक्यातील २४ प्रभारी केंद्रप्रमुखांनी केंद्रप्रमुख पदाचा कार्यभार सोडत शाळेवर हजर झाले आहेत.

mumbai university, xerox center, new exam building, kalina,
मुंबई : नवीन परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?

पालघर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असल्याने, १२८ प्रभारी केंद्रप्रमुखांना त्यांच्या मूळ शाळेवर आणि शून्य शिक्षकी शाळेवर हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांची संख्या कमी असल्याने शिक्षण समितीने हा निर्णय घेतला आहे. केंद्रप्रमुख भरतीची प्रक्रिया झाल्यानंतर केंद्रप्रमुख उपलब्ध होतील.   -शेषराव बडे,  शिक्षणाधिकारी.