पालघर: नवी दिल्ली ते नाव्हा शेवा (जेएनपीटी) दरम्यान उभारण्यात येणाऱ्या समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या पालघर ते गुजरात दरम्यानच्या टप्प्यात मालगाडीची यशस्वी चाचणी दौड पूर्ण करण्यात आली असून यामुळे या मार्गावरील भागाचा उद्घाटन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

८ फेब्रुवारी रोजी ४६ डबे असणारी मालगाडीची चाचणी न्यू मकरपुरा स्थानकापासून संजाण रेल्वे स्थानकादरम्यान चाचणी झाली. या २३८ किलोमीटरच्या चाचणी दरम्यान समर्पित मार्गिकेवर स्वयंचलित सिग्नल प्रणाली तसेच उच्च वाढ उंचीचे ओव्हरहेड उपकरण (ओएचई) प्रणालीची तपासणी देखील या चाचणी दरम्यान करण्यात आली. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने (मिनिस्ट्री ऑफ रेल्वे) ही चाचणी यशस्वी झाल्याचे जाहीर केले.

हेही वाचा – पालघर : दापचरी येथील सीमा तपासणी नाक्यावरील दंड टाळण्यासाठी मालवाहतूक वाहनांची उधवा कासा मार्गे वाहतूक

पालघर जिल्ह्यात बोईसर ते वाणगाव दरम्यान नेवाळे येथे न्यू पालघर रेल्वे स्थानकाचे काम पूर्णत्वाला आले असून रेल्वे मंत्रालयाकडून न्यू पालघरपासून गुजरात पर्यंतच्या वाहिनीचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल असे सूत्रांकडून सांगण्यात येत असून या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे. या मार्गीकेवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या सुरू असून नेवाळे येथील न्यू पालघरपासून सफाळा व वैतानादरम्यान दुसऱ्या टप्प्यात रेल्वे वाहतूक करण्यासाठी देखील युद्धपातीवर काम सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा – पालघर : वाढवण बंदर संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निष्फळ

या स्वतंत्र व समर्पित मालवाहू मार्गीकेचा उपयोग सुरू झाल्यानंतर उपनगरीय क्षेत्रातील प्रवासी गाड्यांसाठी रेल्वेची क्षमता वाढण्याची शक्यता असून डहाणू रोडपर्यंत उपनगरीय सेवेमध्ये त्यानंतर वाढ केली जाईल अशी आशा येथील प्रवासी करीत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Completed trial of dedicated freight lane ssb