नीरज राऊत
पालघर: नवी दिल्ली ते जवाहरलाल नेहरू बंदर क्षेत्रापर्यंत कंटेनरची वाहतूक जलद गतीने करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रकल्पामधील पालघर (नेवाळे) ते गुजरात दरम्यानच्या टप्प्याचे उद्घाटन या आठवडा अखेरीस होणार आहे. त्यामुळे मालगाड्यांना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने विना अडथळा धावण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असून आगामी काळात सफाळे ते गुजरात दरम्यान प्रवासी गाड्यांना व उपनगरीय सेवेला होणाऱ्या मालगाड्यांचा अडथळा दूर होणार आहे.
जपानच्या अर्थसाह्य मधून या समर्पित रेल्वे मार्गाची उभारणी हाती घेण्यात आली होती. याकरिता पालघर जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रेल्वे रुळाच्या पूर्वेकडे दोन स्वतंत्र मार्गीका उभारण्यात आल्या आहेत. या मालिकेसाठी पुलांची उभारणी, रूळ व त्यावरील विद्युत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून आवश्यक चाचणी अंतिम टप्प्यात आहे.
हेही वाचा >>>पालघरमध्ये अपघातांची मालिका, दोन दिवसांत तीन अपघात; चार जणांचा मृत्यू तर सात जण जखमी
या मार्गावरून मालगाड्यांचा विना अडथळा प्रवास व्हावा या दृष्टीने या मार्गावरील रेल्वे फाटके बंद करून ठीकठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. दोन कंटेनर एकावर एक रचून डबल डेकर मालगाडीद्वारे अधिक कंटेनरची वाहतूक करण्याच्या दृष्टीने आठ मीटर निव्वळ उंची मिळेल या पद्धतीची उभारणी करण्यात आली असून सफाळे (कपासे), पालघर (उत्तर), नेवाळे, घोलवड व बोरीगाव येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. याखेरीज पालघर (नवली), उमरोळी, चिखले येथील उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य पद्धतीने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बोईसर व वाणगाव दरम्यान उभारण्यात आलेल्या नेवाळे जवळील “न्यू पालघर )” या रेल्वे स्थानकातून मालगाडीला येत्या शनिवारी (ता १०) हिरवा झेंडा दाखवून न्यू पालघर ते गुजरात दरम्यानच्या डीएफसी मार्गिकेचे उद्घाटन करण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासन, डीएससी तसेच जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. यामुळे वाणगाव पलीकडे गुजरात राज्यापर्यंतचा अस्तित्वात असलेला रेल्वेमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी मोकळा राहील तसेच मालगाड्याला विनाअडथळा सुसाट वेगाने प्रवास करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा >>>कासा : राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी गावाजवळ ट्रकला आग, वाहतूक विस्कळीत
सफाळे पर्यंत होणार विस्तार
बोईसर व वाणगाव दरम्यान उभारण्यात आलेल्या न्यू पालघर प्रमाणे अस्तित्वात असलेल्या सफाळा रेल्वे स्थानकाच्या बाजूला “न्यू सफाळा” स्थानकाची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय “न्यू पालघर” ते “न्यू सफाळे” दरम्यानच्या रेल्वे रुळांची तपासणी व चाचणी सुरू असून सफाळ्यापासून गुजरातच्या दिशेला रेल्वे वाहतुकीसाठी मार्ग एका महिन्याभरात उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
पर्यावरण संवेदनशीलतेचा डहाणू तालुक्याला फटका
पालघर रेल्वे स्थानकाजवळ समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या स्थानकासाठी जागेची उपलब्धता नसल्याने “न्यू पालघर” हे मालवाहू मार्गीकेवरील रेल्वे स्थानक नेवाळे (पालघर तालुका) येथे उभारणी करणे भाग पडले. डहाणू तालुका हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असल्याने “न्यू घोलवड” हे रेल्वे स्थानक डहाणू तालुक्याच्या पलीकडे गुजरात राज्यात उंबरगाव व संजाण दरम्यान उभारण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.