‘ऐ दिल है…’च्या स्पेशल स्क्रिनिंगलाही ऐश्वर्याची गैरहजेरी
- 1 / 6
विविध अडथळे पार केल्यानंतर सरतेशेवटी करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत. या चित्रपटाला होणारा विरोधही आता मावळला असल्यामुळे अगदी जोमाने चित्रपटाच्या प्रमोशनलाही सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या टीमसोबत अनुष्का शर्मा दिसत नव्हती. पण, सध्या तिने वेळात-वेळ काढत या चित्रपटाच्या प्रमोशनलाही प्राधान्य दिले आहे. या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच पार पडले. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहऱ्यांनी करणच्या या चित्रपटाचा आनंद घेतला आणि त्यावर प्रतिक्रियाही दिल्या. पण कलाकारांच्या गर्दीत या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय मात्र कुठेच दिसली नाही. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 2 / 6
'डिअर जिंदगी' या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या चर्चेत असलेली आलिया भट्टही या स्क्रिनिंगला आली होती. या चित्रपटामध्ये आलियासुद्धा कॅमिओद्वारे झळकणार आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 3 / 6
रणबीर कपूरचा चांगला मित्र आणि अभिनेता अर्जुन कपूरही बऱ्याच दिवसांनंतर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला दिसला. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 4 / 6
करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडण्ट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रानेही 'ऐडिएचएम'च्या स्क्रिनिंला येण्यास प्राधान्य दिले. गेले काही दिवस आलिया भट्ट आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 5 / 6
दिग्दर्शक आयान मुखर्जीनेही रणबीर आणि अनुष्कासह या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचा आनंद घेतला. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
- 6 / 6
अनेकजण करणच्या दिग्दर्शनाची आणि या चित्रपटाची प्रशंसा करत असताना खुद्द करण मात्र या स्क्रिनिंगदरम्यान काहीसा व्यग्रच होता. (छाया सौजन्य- Varinder Chawla)