
सध्या कलाविश्वामध्ये अनेक स्टार किड पदार्पण करत आहेत. अनन्या पांडे, सारा अली खान अशा अनेक बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या मुलांनी अभिनायच्या दुनियेत पदार्पण केले आहे. यामध्ये मराठी स्टार किड्स ही मागे नाहीत. अभिनेते महेश मांजरेकर यांची धाकटी मुलगी सई मांजरेकर कलाविश्वाची वाट धरण्यास सज्ज झाली आहे.

सई मांजरेकर लवकरच सलमान खानच्या ‘दबंग ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटात ती सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असून सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


भाईजान सलमानच्या 'दबंग ३' चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष लागून राहिले आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. पण सईचा लूक व्हायरल होऊ नये म्हणून सलमानने सेटवर मोबाइलच्या वापरावर बंदी ठेवली आहे.
