-
काही दिवसांपासून सोनू निगम, भूषण कुमार आणि दिव्या खोसला कुमार यांची नावं चर्चेत आहेत. (सर्व फोटो – दिव्या खोसला कुमार, इन्स्टाग्राम)
-
सोनू निगमने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यामुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या.
-
व्हिडीओमध्ये त्याने अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे असे म्हटलं होतं.
-
त्यावेळी नाव घेतलं नसलं तरी नंतर त्यानं अरमान मलिक, अमाल मलिक, निर्माते भूषण कुमार यांच्यावर टीका केली होती.
-
यावरून टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार हिनं सोनू निगमला चांगलंच सुनावलं होतं.
-
दिव्या कुमार ही गेल्या काही वर्षांपासून बॉलिवू़डमध्ये सक्रिय आहे. तिनं अनेक चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे.
-
२० नोव्हेंबर १९८१ मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला.
-
सुरूवातीपासूनच चित्रपट क्षेत्रात अधिक रस असल्यामुळे तिनं दिल्ली सोडून मुंबईची वाट धरली.
-
२००४ मध्ये तिनं लव टुडे या चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं
-
त्यानंतर फाल्गुनी पाठकच्या अय्यो रामा या गाण्यातही ती दिसली होती.
-
त्यानंतर तिला अक्षय कुमार आणि बॉबी देओल यांच्या सोबत 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो' या चित्रपटात अभिनय साकारण्याची संधी मिळाली.
-
याच चित्रपटादरम्यान तिची भेट भूषण कुमार यांच्यासोबत झाल्याचं सांगण्यात येत.
-
त्यांची ती भेट प्रोफेशनल असली तरी त्यांनंतर त्यांच्या गप्पाही रंगू लागल्या होत्या.
-
भूषण कुमार यांच्यासोबत विवाह केल्यानंतरही ती चित्रपट क्षेत्राशी जोडलेलीच होती. तसंच यासोबत तिनं काही कोर्सही केले.
-
तिनं दिग्दर्शन आणि एडिटिंगचा कोर्सही केला. त्यानंतर तिनं काही गाण्यांचं आणि जाहिरातींचं दिग्दर्शनही केलं.
-
अनेक गाण्यांचं दिग्दर्शन केल्यानंतर तिनं २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या यारीया या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं. तसंच चित्रपटातील ५ गाणी कोरिओग्राफही केली.
-
यानंतर सनम रे या चित्रपटाच्या माध्यमातूनही ती चर्चेत आली होती. २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
२०१५ मध्ये, दिव्या रणबीर कपूरच्या 'रॉय' चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होती.
-
२०१९ मध्ये दिव्या तिच्या 'याद पिया की आगे लगे' या गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आली होती. हे गाणं नेहा कक्कडनं गायलं होतं.
-
सध्या ती पुन्हा सोनू निगमवरील आरोपांवरून पुन्हा चर्चेत आली आहे.

Mayuri Hagawane: “वैष्णवी गर्भवती असताना तिला…”, हगवणे कुटुंबाच्या छळाचा मोठ्या सुनेनं वाचला पाढा