महेश भट्ट यांना ‘डॉन’ म्हणणारी अभिनेत्री लविना लोध कोण?
- 1 / 10
अभिनेत्री लविना लोध हिने बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "महेश भट्ट यांच्यासह त्यांचा भाऊ मुकेश भट्ट हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील मोठे डॉन आहेत. दोन्ही भावांनी बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे," असा गंभीर आरोप लविनानं केला होता. महेश भट्ट यांच्याविरुद्ध केलेल्या गंभीर आरोपांमुळे लविना लोध चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य/instagram/luvienalodh)
- 2 / 10
महेश भट्ट यांच्यावर आरोप करणारी लविना कोण आहे? तिचा महेश भट्ट यांच्याशी काय संबंध आहेत? असे प्रश्न तिने केलेल्या आरोपानंतर चर्चेत आहेत.
- 3 / 10
महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याच्याशी लविना लोधनं लग्न केलं होतं. पण, दोघांमधील संबंध बिघडले आणि दोघेही वेगळे झाले. महेश भट्ट यांच्यावर आरोप करणाऱ्या व्हिडीओत लविनाने सुमितवरही आरोप केले आहेत. "सुमित चित्रपट सृष्टीत ड्रग्जचा व्यवसाय करतो. तो अमायरा दस्तूर, सपना पब्बी यासारख्या अभिनेत्री ड्रग्ज पुरवतो. त्याचबरोबर चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांना मुलीचे फोटोही पाठवतो. याची सगळी माहिती महेश भट्ट यांना आहे," असा आरोप लविनाने केला आहे.
- 4 / 10
लविनाच्या आतापर्यंतच्या चित्रपटसृष्टीतील करिअरवर नजर टाकली, तर लविनाने सर्वात आधी 'सिने स्टार्ज की खोज' कार्यक्रमातून समोर आली होती. येथूनच तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने कन्नड चित्रपटात अभिनय केला. निर्दोष असं त्या सिनेमाचं नाव होतं.
- 5 / 10
लविनाने तेलगू चित्रपटातही काम केलेलं आहे. तिने बॉलिवूड आणि जज डान्समध्ये प्रशिक्षण घेतलं. चार वर्षापूर्वी २०१६मध्ये लविना स्वच्छ भारत अभियानाच्या एका शॉर्ट फिल्ममध्येही झळकली होती. 'हम में है दम' असं या प्रोजेक्टचं नाव होतं.
- 6 / 10
लविनाने त्यानंतर सोनी लिव्हच्या गर्ल ऑन हिल्समध्ये काम केलं होतं. २०१९ मध्ये लविना 'हमसे ना हो पाएगा' या वेब सीरिजमध्ये झळकली.
- 7 / 10
अभिनयाबरोबरच लविनाने अनेक प्रसिद्ध ब्रँडसाठीही काम केलेलं आहे. डेनियल वेलिग्टन, शीन, रिलायन्स, स्टॉकबॉय लव्ह आणि एअरटेल या कंपन्यासाठी जाहिराती केल्या आहेत. ती स्वतः लविना लोध डायरी हे यू ट्यूब चॅनलही चालवते.
- 8 / 10
महेश भट्ट आणि लविना लोध यांच्यातील वादावर नजर टाकायची झाली. तर लविनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिने महेश आणि मुकेश भट्ट या दोघांनाही सर्वात मोठे डॉन असल्याचं संबोधलं आहे. लविनाने केलेल्या आरोपानंतर महेश भट्ट यांनीही तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
- 9 / 10
चित्रपट दिग्दर्शक, निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी तिच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला होता.
- 10 / 10
न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्यासमोर या याचिकेवर सोमवारी तातडीची सुनावणी झाली. त्यावेळी लोध हिला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्या वेळी लोध हिच्याकडून भट बंधुंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले जाणार नसल्याचे तिच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले होते. कायदेशीर नोटीस बजावूनही लोध हिने बदनामी न थांबवल्याने भट्ट बंधूंनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेत तिच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. ही चित्रफित समाजमाध्यमावरून काढून टाकण्याची मागणीही केली. सब्रवाल हा आपल्याशी थेट संबंधित नाही. तर तो आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या भावाचा मुलगा आहे, असे त्यांनी सांगितले होते. (फोटो सौजन्य/instagram/luvienalodh)