
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सेन हिला अपना टाइम भी आएगा या मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

लक्षवेधी बाब म्हणजे ही मालिका अगदी गेल्या महिन्यातच सुरु झाली आहे. अन् केवळ १८ भागानंतरच निर्मात्यांनी अनुष्काला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

परिणामी या मालिकेत आता अनुष्काच्या जागी अभिनेत्री मेघा रे हिची वर्णी लागली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

निर्मात्यांनी ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनुष्कावर जोरदार टीका केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

अनुष्का आपल्या कामाच्या प्रती प्रामाणिक नव्हती. सेटवर ती खूप उशीरा पोहोचायची. तिच्यामुळे इतर कलाकारांना ताटकळत बसावं लागे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

ती स्वत:च्या डायलॉग्सचं पाठांतर व्यवस्थित करत नसे. शिवाय इतर कलाकारांशी ती उद्धटपणे वागायची. परिणामी तिच्या नखऱ्यांना वैतागून तिला मालिकेतून बाहेर काढण्यात आलं असा दावा निर्मात्यांनी केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

निर्मात्यांनी केलेले हे आरोप अनुष्काने मात्र फेटाळून लावले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

"मला मालिकेतून काढलं नाही तर मी स्वत:च मालिका सोडून दिली. मालिकेच्या पटकथेत दम नव्हता. शिवाय माझी तब्येत ठिक नव्हती त्यामुळे मालिका सोडून देण्याचा निर्णय घेतला." असं प्रत्युत्तर अनुष्काने दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

अनुष्का सेन ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

बालवीर या सुपरहिरो मालिकेमुळे ती प्रसिद्ध झाली होती. शिवाय क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीसोबत तिने एका जाहिरातीत काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)