‘अभिनव तर माझा आहे’; अर्शीने पतीसोबत केलेलं फ्लर्टिंग पाहून रुबिना संतापली
- 1 / 10
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 10
बिग बॉसचा १४ वा सीझन सुरु होऊन आता आठ आठवडे उलटून गेले आहेत. दरम्यान फायनलच्या दिशेने जात असतानाच आता शोमध्ये नव्या स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 10
कश्मिरा शाह, विकास गुप्ता आणि अर्शी खान हे तीन नवे स्पर्धकांचं बिग बॉसच्या घरात आगमन झालं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 10
मात्र या तिघांमध्ये अभिनेत्री अर्शी खान सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. घरात येताच तिने रूबिना दिलैकचा पती अभिनव शुक्लासोबत फर्ल्ट करण्यास सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 10
"अभिनव तू माझा आहेस. मला तू खूप आवडतोस. तुझे लक्ष वेधून घेण्यासाठीच मी इतका मेकअप करतेय. मी अभिनवसाठी ब्रेकअप करुन आले आहे." असं म्हणत ती अभिनवसोबत फ्लर्टिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 10
मात्र तिचं फ्लर्टिंग अभिनवची पत्नी रूबिनाला मात्र आवडलेलं नाही. "कृपया माझ्या पतीपासून थोडं अंतर ठेव" असं तिने अर्शीला ठणकावून सांगितलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 10
त्यांच्या या शीतयुद्धाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 10
अर्शी खान एक प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 10
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 10
यापूर्वी बिग बॉसच्या १२व्या सीझनमध्ये ती झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)