नव्या वर्षात कंगना-उर्मिलाची नवी खडाजंगी; पाहा काय आहे प्रकरण
- 1 / 15
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना रौनत यांच्यामध्ये २०२० मध्ये झालेला शाब्दिक वाद चर्चेचा विषय होता. आता २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघींमध्ये पन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.
- 2 / 15
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईमध्ये तीन कोटी ७५ लाख रुपयांचं ऑफिस खरेदी केलं. यानंतर कंगनानं केलेल्या टीकेमुळे वादाला सुरुवात झाली आहे.
- 3 / 15
कंगनानं टीका करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, भाजपाला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीनं घर विकत घेतलं होतं. पण काँग्रेस ते तोडत आहे.
- 4 / 15
भाजपाला खूश करुन माझ्या हातात फक्त २५-३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रसला खूश केलं असते.
- 5 / 15
कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेटकरी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. पण कंगनाच्या या ट्विटनंतर उर्मिलानेही आपल्या खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
- 6 / 15
प्रिय कंगनाजी, माझ्या बाबतचे तुमचे सर्व विचार मी ऐकले, मीच काय संपूर्ण देशानं ऐकले आहेत. संपूर्ण देशासमोर सांगतेय की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा.. सर्व कागदपत्रं घेऊन मी येते. या कागदपत्रामध्ये २०११ मध्ये स्वत:च्या मेहनतीवर अंधेरीत फ्लॅट विकत घेतल्याचा पुरवा मिळेल.
- 7 / 15
२५-३० वर्षाच्या कारकिर्दीनंतर ही संपत्ती विकत घेतली होती, त्याचे पुरावं आहेत. तसेच मार्च २०२० मध्ये तोच फ्लॅट विकल्याची कागदपत्रं आणि पुरावे असतील. त्याच पैशातून विकत घेतलेल्या ऑफिसची कागदपत्रं असतील. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून ऑफिस विकत घेतले आहे, हेही दाखवेन, असं उर्मिला म्हणाल्या आहेत.
- 8 / 15
खार येथे उर्मिला यांनी तीन कोटींपेक्षा जास्त रुपयाचं नवीन ऑफिस विकत घेतल्याचं वृत्त सकाळी धडकलं. त्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चेला उधाण आलं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिलानं कोट्यवधीचं ऑफिस विकत घेतल्याच्या बातम्याही आल्या.
- 9 / 15
रिपोर्ट्सनुसार उर्मिला यांचं हे नवीन ऑफिस १००० स्क्वेअर फूटमध्ये विस्तारलेलं आहे. खार वेस्ट येथे लिंकिंग रोडवर उर्मिलानं आपलं नवीन ऑफिस विकत घेतलं आहे.
- 10 / 15
या इमारतीतील ऑफिसचं प्रतिमहिन्याचं भाडं जवळपास पाच लाख रुपयांचं असल्याची चर्चा आहे.
- 11 / 15
उर्मिला मातोंडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, 'मी ऑफिस घेतलं हे खरं आहे. मात्र प्रसारमाध्यमांनी फक्त अर्ध सत्य छापलं.
- 12 / 15
मार्च २०२० मध्ये अंधेरी डी.एन. नगर येथे असणारा माझा एक फ्लॅट मी विकला होता. या पैशातून मला खरेदी करायची होती. मात्र लॉकडाउनमुळे सर्व नियोजनावर पाणी फिरलं. आता त्याच पैशांमधून नवीन कार्यालय विकत घेतलं आहे.
- 13 / 15
सर्व कागदपत्रं त्याच रजिस्टेन कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना व्यवस्थित द्याव्यात. आतापर्यंत प्रत्येक व्यवहाराचे सर्व कागदपत्रं आणि पुरावे आहेत. मला तोडण्याचा प्रयत्न करु नका...'
- 14 / 15
उर्मिलानं आपल्या शैलीत उत्तर दिल्यानंतर आता कंगना काय भूमिका मांडतेय? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
- 15 / 15
गेल्यावर्षी दोघींमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. आता नववर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा ठिणगी पेटली आहे. पाहूयात यापुढे आणखी काय-काय प्रतिक्रिया येतात...