पाहून विश्वास बसणार नाही; ‘हे’ आहेत बॉलिवूडचे ट्रान्सजेंडर स्टार्स
- 1 / 15
बॉलिवूड इंडस्ट्रीला ग्लॅमरचे विश्व म्हणतात. प्रत्येकाने इथे आपली एक ओळख निर्माण केली आहे. मग ते कलाकार असो किंवा फॅशन डिझायनर. त्यात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपली ओळख आणि अस्तित्व बदललं. फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे जो आता सायशा झाला आहे. बॉबी डार्लिंग, गौरी अरोरा, अंजली धारीवाल, निक्की चावला सारखे कलाकार आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल...
- 2 / 15
सायशा- नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वप्निल शिंदेने आपल्या जीवनाची नवीन सुरूवात केली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे आता सायशा झाला आहे.
- 3 / 15
स्वप्निलने करीना कपूर, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, सनी लिओनी, कतरिना कैफ आणि कियारा अडवाणी यांसारख्या अभिनेत्रींसोबत काम केलंय.
- 4 / 15
बॉबी डार्लिंग - 'ताल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या बॉबी डार्लिंगला सगळेच ओळखतात. बॉबीने छोट्या पडद्यावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉबी डार्लिंगचे आधीचे नाव पंकज शर्मा आहे.
- 5 / 15
पंकजने २०१० मध्ये शस्त्रक्रियेनंतर आपले नाव बदलून पाखी शर्मा केले. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने आपले नाव पुन्हा एकदा बदलून बॉबी डार्लिंग केले.
- 6 / 15
अंजली लामा - नेपाळची अंजली लामा ही तिच्या देशातील पहिली ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. अंजलीचे बालपणीचे नाव नवीन वहिबा होते. पण शस्त्रक्रियेनंतक नाव बदलून अंजली लामा ठेवले.
- 7 / 15
अंजलीने पहिल्यांदा काठमांडूमध्ये मॉडेलिंगला सुरूवात केली. त्यावेळी गावातल्या एका व्यक्तीला कळून चुकले की अंजली एक ट्रान्सजेंडर आहे. त्या व्यक्तीने लगेच तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबतचे सगळे नाते संपवले.
- 8 / 15
निक्की चावला- निक्की चावलाने २००९ मध्ये लिंग परिवर्तन केले. निक्की ही दिल्लीची राहणारी असून खूप सुंदर आहे. तिच्याकडे पाहून असं कोणी म्हणणार नाही की ती ट्रान्सजेंडर आहे.
- 9 / 15
निक्कीच्या कुटुंबीयांनी लिंग परिवर्तनासाठी तिला संमती दिली नव्हती. तरीही निक्कीने त्यांच्या विरोधात जाऊन लिंग परिवर्तन केले.
- 10 / 15
गौरी अरोरा - एमटिव्ही वरील स्प्लिट्स व्हिलाचा माजी स्पर्धक गौरव अरोराने लिंग परिवर्तन करून गौरी झाला आहे. एका मुलाखतीत गौरीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.
- 11 / 15
गौरी अरोरा म्हणजेच लहानपणीच्या गौरवला मुलींची वेषभूषा करण्यास आवडायचे. तिने 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल'मध्ये स्पर्धक होती.
- 12 / 15
गजल धालीवाला - बॉलिवूडमध्ये लेखक आणि अभिनेत्री म्हणून ओळख निर्मान करणारी गजल धालीवालने सुद्धा लिंग परिवर्तन केले आहे. लेखक म्हणून तिने एक लड़की को देखा तो ऐसा लगा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
- 13 / 15
गझल धालीवालने लिंग परिवर्तनावर बोलताना सांगितले की, लहान पणापासून त्याला मुलगी असल्यासारखे वाटायचे आणि त्याने आपल्या कुटुंबीयांना याबद्दल सांगितले.
- 14 / 15
शिताना सांघा दक्षिण आशियातील एक प्रसिद्ध ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. लिंग परिवर्तन केल्यानंतर त्याने अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये पुरस्कार जिंकले.
- 15 / 15
शिनाता सांघा अनेक प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसते. याशिवाय २०१० ते २०१२ लागोपाठ तिने सर्वात सुंदर ट्रान्सजेंडरचा किताब पटकावला.