Birthday Special : केतकी माटेगांवकरबद्दल काही खास गोष्टी
- 1 / 10
अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकरचा आज वाढदिवस आहे. (फोटो सौजन्य - केतकी माटेगावकर/इंस्टाग्राम)
- 2 / 10
आपल्या सुमधूर सुरांनी तरुणाईला मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी आघाडीचं नाव म्हणजे केतकी माटेगांवकर.
- 3 / 10
वयाच्या चौथ्या वर्षापासून केतकीने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं.
- 4 / 10
गायिका असण्यासोबतच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्री सुद्धा आहे.
- 5 / 10
कोवळ्या वयातील प्रेमभावनांचा प्रवास उलगडणाऱ्या ‘शाळा’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
- 6 / 10
केतकी माटेगावंकरला २०१२ साली 'काकस्पर्श' या चित्रपटातील भूमिकेसाठी इंटरनॅशनल फिल्म ॲण्ड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
- 7 / 10
बिकट परिस्थितीत शाळकरी मुलीपासून ते कलेक्टर झालेल्या तरुणीच्या प्रवासाची कथा सांगणाऱ्या 'तानी' या चित्रपटातही ती झळकली आहे.
- 8 / 10
गायन आणि अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतर संगीतकाराच्या रूपात समोर आलेली केतकी माटेगावंकर सध्या चांगलीच प्रकाशझोतात आहे.
- 9 / 10
केतकीची आई सुवर्णा माटेगांवकर प्रसिद्ध गायिका आहेत. वडील उत्तम हर्मोनियम वादक आहेत. त्यामुळे केतकीला कुटुंबाकडूनच संगीताचा वारसा मिळाला आहे.
- 10 / 10
अभिनय, गायन यांच्यासोबतच सौंदर्याच्या जोरावर आज केतकीने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतो.