कोणते आहेत या वर्षातले नवे चित्रपट? जाणून घ्या
- 1 / 11
सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट २३ एप्रिलला पाहायला मिळेल.
- 2 / 11
कपिल देवच्या आयुष्यावर आधारित ‘83’ या चित्रपटात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसेल. 4 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
- 3 / 11
18 जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं नागराज मंजुळे यांनी केलं आहे.
- 4 / 11
5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसेल. तर त्याच्यासोबत संजय दत्त, मनुशी छिल्लर, सोनू सूद हे कलाकारही दिसणार आहेत.
- 5 / 11
बेलबॉटम चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता हे प्रमुख भूमिकेत दिसतील.28 मेला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
- 6 / 11
२५ जूनला रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त यांचा ‘शमशेरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
- 7 / 11
‘शेरशहा’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. 02 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
- 8 / 11
19 मार्चला ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा हे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील.
- 9 / 11
रणवीर सिंग, बोमन इराणी, रत्ना पाठक शाह, शालिनी पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट 27 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
- 10 / 11
अक्षय कुमारचाच सारा अली खान आणि धनुषसोबतचा अतरंगी रे हा चित्रपट 06 ऑगस्टला प्रदर्शित होईल.
- 11 / 11
आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘चंदीगढ करे आशिकी’ हा चित्रपट 09 जुलै रोजी प्रदर्शित होईल.