बॉलिवूडच्या ‘उर्वशी’ची चाहत्यांना मोहिनी, पहा उर्वशीच्या हॉट अदा
- 1 / 10
बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रीपैकी एक असलेल्या उर्वशी रौतेलाचा आज 27 व्या वाढदिवस आहे. आपल्या मादक अदांनी उर्वशीने अनेक चाहत्यांच्या मनावर जादू केलीय. नावाला साजेचस सौदर्य आणि हॉट अंदाज यामुळे उर्वशी कायम चर्चेत असते. (photo credit- instagram@urvashirautela)
- 2 / 10
2011 मध्ये उर्वशीने मिस एशियन सुपर मॉडलच्या किताबावर आपलं नाव कोरलं. सनी देओलच्या 'सिंह साहब- द ग्रेट' या सिनेमातू उर्वशीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
- 3 / 10
उर्वशीने भाग जानी, सनम रे, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, पागलपंती, वर्जीन भानुप्रिया अशा सिनेमांमधून चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
- 4 / 10
नैनीतालमध्ये उर्वशीचा जन्म झाला असून अगदी कमी वयातच तिला फॅशन इंडस्ट्रीच आकर्षण वाटू लागलं. अवघ्या 15 वर्षांची असताना उर्वशीने सौदर्य स्पर्धेत भाग घेतला होता.
- 5 / 10
17 वर्षाची असताना उर्वशीने मिस युनिवर्सल इंडियाच्या स्पर्धेत भाग घेऊन .'मिस युनिवर्सचा' किताब जिंकला.
- 6 / 10
कोटद्वार इथं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीतून तिने तिचं उच्च शिक्षण पूर्ण केलं. उर्वशीने 2011 सालात 'मिस टुरिझम क्वीन ऑफ द इअर'ची किताब देखील पटकावलाय.
- 7 / 10
अभिनयासोबतच उर्वशी एक उत्तम बास्केटबॉल खेळाडू आहे. उर्वशीने राष्ट्रीय पातळीवरील बास्केटबॉल स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला होता.
- 8 / 10
हॉट लूक आणि बोल्ड स्टाइलमुळे उर्वशी कायम चर्चेत असेत. ती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोट आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांची पसंती मिळवत असते.
- 9 / 10
जाहिरात आणि मॉडलिंग क्षेत्रातही उर्वशीने तिचे वेगळे ओळख निर्माण केलीय. अनेक बड्या डिझायनरसाठी उर्वशीने रॅम्पवॉक केलंय.
- 10 / 10
तसचं उर्वशी तिच्या महागड्या कपड्यांमुळे किंवा ज्वेलरीमुळे देखील अनेकदा चर्चेत असते. अफलातून सौदर्याने चाहत्यांना मोहिनी घालणाऱ्या उर्वशीला तिच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.