-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. (फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी / इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर-४' शूटिंग करणं रद्द केलंय. मंगळवारी 'सुपर डान्सर-४' चं मुंबईत शूटिंग पार पडणार होतं. मात्र राज कुंद्राला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी शूटिंगलला पोहचली नाही. (फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी / इन्स्टाग्राम)
-
स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार मंगळवारी २० जुलैला मुंबईत या शोच्या एपिसोडचं शूटिंग पार पडणार होतं. शिवाय या भागासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर गेस्ट म्हणून हजेरी लावणार होती.
-
मात्र अगदी शेवटच्या क्षणी शिल्पा शेट्टीने तिचं शूटिंग रद्द केलं. त्यामुळे उर्वरित परिक्षकांच्या उपस्थितीत शूटिंग पार पडलं.
-
सूत्रांच्या माहितीनुसार शोच्या टीमने आता करिश्मा कपूरलाच पुढील दोन दिवसांसाठी लॉक केलं आहे.
-
एवढचं नाही तर शिल्पा जर शोमध्ये पुन्हा आली नाही तर करिश्मा कपूर शिल्पाच्या जागी रिल्पेस होऊ शकते.
-
सध्या शोची मेकिंग टीम शिल्पाच्या परण्याची वाट पाहत असून शिल्पाला शूटिंगवर परतणं शक्य झालं नाही तर टीम करिश्मा कपूरशी संपर्क साधणार आहे.
-
करिश्मा कपूरने नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. #superdancerchapter4 हा हॅशटॅगही वापरला आहे. (सर्व फोटो सौजन्य : करिश्मा कपूर / इन्स्टाग्राम)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”