
सध्या ओटीटीचा जमाना आहे. अनेक जण ओटीटीवरील वेब सीरिज बघत आपला फावला वेळ किंवा विकेंड घालवतात.

क्राइम, थ्रीलर, रोमान्सने भरपूर असलेल्या अनेक वेब सीरिज ओटीटीवर उपलब्ध आहेत.

परंतु या वेब सीरिज फॅमिलीसोबत एकत्र बसून पाहण्यास संकोच वाटतो.

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही कॉमेडी वेब सीरिजही आहेत ज्या तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकता.

गुल्लक : सोनी-लिववरील ‘गुल्लक’ ही एक कॉमेडी वेब सीरिज आहे.

या वेब सीरिजची कथा मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यावर आधारित आहे.

गुल्लक वेब सीरिजचे तीन सीजन प्रदर्शित झालेले आहेत. हलके-फुलके विनोद असलेली ही वेब सीरिज तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकता.

पर्मनन्ट रूममेट्स : ‘पर्मनन्ट रूममेट्स’ ही वेब सीरिज एमएक्स प्लेयरवर उपलब्ध आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याची कहाणी या वेब सीरिजमधून दाखवण्यात आली आहे. (फोटो : आयएमडीबी)

गर्लफ्रेण्डसोबत लग्न करण्यासाठी परदेशातून भारतात परतलेल्या बॉयफ्रेण्डला त्याच्या गर्लफ्रेण्डच्या इच्छेमुळे लिव्ह इनमध्ये राहावं लागतं. रोमांचक कथा असलेल्या ‘पर्मनन्ट रूममेट्स’ या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत.(फोटो : आयएमडीबी)

पंचायत : ‘पंचायत’ ही एक कॉमेडी वेब सीरिज आहे. शहरातील अभिषेकला ‘फुलेरा’ नावाच्या एका छोट्याशा गावात सरकारी नोकरी लागते.

शहरात राहिलेल्या अभिषेकला गावात आल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

‘पंचायत’ ही वेब सीरिज खूप गाजली होती. अॅमेझॉन प्राइमवर ही वेब सीरिज तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकता.

माइंड द मल्होत्राज : एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्या नवरा-बायकोवर आधारित या वेब सीरिजची कथा आहे.

मित्र-मैत्रिणींचे होणारे घटस्फोट पाहून नात्यात दुरावा निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका निरागस जोडप्याची ही कहाणी आहे.

ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.

ट्रिपलिंग : एमएक्स प्लेयरवर असलेली ‘ट्रिपलिंग’ ही वेब सीरिज रोड ट्रिपवर निघालेल्या तीन भाऊ-बहिणीची कहाणी आहे.

या वेब सीरिजमध्ये अनेक ट्विस्ट असून सीरिजचे दोन सीजन प्रदर्शित झाले आहेत.

(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)