-
संजय दत्त हा बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आहे. आपल्या अभिनयाने त्याने करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
तर काही प्रसंगी त्याच्या विचित्र वागण्याचा त्याला फटका देखील बसला आहे.
-
त्याच्या अशा वागण्यामुळे अनेकांसोबत त्याचे संबंध देखील बिघडल्याचे दिसून आले आहे.
-
तरुणाईमध्ये संजय दत्त हा संजूबाबा नावाने प्रसिद्ध आहे.
-
एकदा संजय दत्त मद्यधुंद अवस्थेत श्रीदेवीच्या खोलीत पोहोचला होता.
-
खरे तर हे संपूर्ण प्रकरण हिम्मतवाला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे आहे. या चित्रपटात श्रीदेवी मुख्य भूमिकेत होती, तर तिच्यासोबत अभिनेता जितेंद्र होता.
-
संजय दत्त हा श्रीदेवीचा खूप मोठा चाहता होता. श्रीदेवी मुंबईतच शूटिंग करत असल्याचे कळताच तो तिला भेटण्यासाठी सेटवर पोहोचला. तेव्हा तो दारूच्या नशेत होता.
-
सेटवर त्याला श्रीदेवी हॉटेलच्या खोलीत गेल्याचे समजले. संजय दत्त काहीच विचार न करता त्याच अवस्थेत तिच्या खोलीत गेला.
-
संजय दत्तला त्या अवस्थेत पाहून श्रीदेवी घाबरली आणि आरडाओरडा करू लागली.बराच गदारोळ झाला. त्या दिवसापासून दोन्ही कलाकारांचे नाते असे बिघडले की ते पुन्हा कधीच सुरळीत झाले नाही.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवीने या दिवशी निर्णय घेतला होता की ती संजय दत्तसोबत कधीही काम करणार नाही. मात्र, अनेक वर्षांनंतर ते दोघे गुमराह या चित्रपटात एकत्र दिसले.
-
गुमराहच्या सेटवर या दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येते. दोघेही सेटवर यायचे आणि आपले काम करून निघून जायचे.
-
संजय दत्त हा श्रीदेवीचा मोठा चाहता होता पण श्रीदेवीला तो आवडत नव्हता. त्याच्या व्यसनांच्या सवयीमुळे ती त्याच्यावर प्रचंड नाराज होती.

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण