
अभिनेत्री हिना खान (Hina Khan) आणि शिवांगी जोशी (Shivangi Joshi) दोघींनी टीव्ही शो ‘यह रिश्ता क्या कहलाता है’मध्ये (Yeh Rishta Kya Kehlata Hai) काम केलंय.

हिना या शोमध्ये अक्षराची भूमिका करत आहे, तर शिवांगी नायरा या व्यक्तिरेखेची भूमिका करत आहे.

शिवांगी जोशी हिना खानला रोल मॉडल (Shivangi Joshi Role Model) मानते.

शिवांगी जोशीची रोल मॉडल हिना खानने नुकतेच इंस्टाग्रामवर सफेद ड्रेमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये हिना खान अत्यंत सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे.

हिनाच्या चाहत्यांना तिचे हे फोटो चांगलेच आवडले आहेत.

कमेंट सेक्शनमध्ये कुणी हिनाला हॉट म्हणत आहे, तर कुणी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहे.

हिना दररोज इंस्टाग्रामवर आपल्या नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर करत आहे.

असं असलं तरी काही वेळा फोटोंवरून हिना खानला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. (सर्व छायाचित्र : हिना खान इंस्टाग्राम)